लाजिरवाणे! हत्तीच्या दातांना लटकून मारत होती पुशअप्स; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 20:03 IST2021-01-06T19:56:40+5:302021-01-06T20:03:50+5:30
Trending Viral News in Marathi : आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका महिलेनं हत्तीच्या दातांचा वापर करून केलेला लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे.

लाजिरवाणे! हत्तीच्या दातांना लटकून मारत होती पुशअप्स; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल
हत्ती हा खूप प्रेमळ आणि शांत प्राणी आहे. गेल्या काही महिन्यात हत्तीणी आणि हत्तीवर झालेल्या अत्याचाराच्या अनेक घटना व्हायरल झाल्या . यावेळी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले गेले. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका महिलेनं हत्तीच्या दातांचा वापर करून केलेला लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. माणसांनी केलेल्या अत्याचारामुळे प्राण्यांना अनेक वेदना सोसाव्या लागतात.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असेलल्या महिलेचा विचित्र प्रकार वााचून तुम्हालाही राग येईल.
या महिलेनं व्यायाम करण्यासाठी हत्तीच्या दातांचा वापर केला आहे. Emma Roberts नावाच्या महिलेनं हत्तीच्या दातांना लटकून पुशअप्स मारले आहेत. इंडिया टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार ही घटना दक्षिण आफ्रिकेतील मुबलामध्ये घडली आहे. एका हत्ती पार्कमध्ये महिलेनं हा कारनामा केला आहे.
लय भारी! न्हाव्याला मुलगी झाली अन् आनंदाच्या भरात साऱ्या गावाला मोफत सर्व्हीस दिली
सोशल मीडियावर एलिफंटपार्कमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. हा फोटो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हत्तीच्या दातांचा उपयोग वजन उचलण्यासाठी केला जाऊ शकत नाही. प्राण्यांचा विश्वास जिंकणं शिका. अशा आशयाचे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकांनी प्राण्यांबाबत सहानुभूती ठेवायला हवी. अशाही कमेंट्स आल्या आहेत.
याला म्हणतात भक्ती! मंदिरासमोर मारुतीरायाला अखेरचं दंडवत घातलं अन् वानरानं सोडले प्राण