लय भारी! न्हाव्याला मुलगी झाली अन् आनंदाच्या भरात साऱ्या गावाला मोफत सर्व्हीस दिली

By manali.bagul | Published: January 6, 2021 03:28 PM2021-01-06T15:28:46+5:302021-01-06T15:41:13+5:30

पहिली बेटी धनाची पेटी असं म्हटलं जातं. पण समाजात असे अनेक लोक आहेत. जे अजूनही मुलगा किंवा मुलगी यात भेदभाव करताना दिसून येतात. भारतातील अनेक राज्यांमध्ये मुलीच्या जन्मामुळे नाराजी व्यक्त करणारे लोक दिसून येतात. काही लोक असेही असतात जे मुलीच्या जन्माने आनंद व्यक्त करतात. ग्वाल्हेरमधील एका सलूनवाल्याच्या घरी मुलगी जन्माला आली. मुलीच्या जन्माचा आनंद खूपच वेगळ्या प्रकारे साजरा केला आहे. त्यांनी ग्वाल्हेरमधील आपल्या तीन सलून्समध्ये लोकांना फ्री सर्व्हीस दिली आहे. सोशल मीडियावर या सलूनवाल्याचे खूप कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर जेव्हा ही घटना व्हायरल झाली तेव्हा सलूनमध्ये लोकांनी लांबचलांब रांगा लावल्या. सलमानने दिलेल्या माहितीनुसार तीन दुकानांमध्ये त्यांचे कर्मचारी १५ तास सतत काम करून लोकांना सेवा पुरवत होते. त्यावेळेत त्यांनी लोकांचे हेअर कट आणि शेविंग मोफत करून दिले. सलमान यांचे सलून कुम्हारापुरा, शिवाजी नगर, टाल रोज आणि कबीर कॉलनीत आहे.

सलमान यांच्या घरी पहिल्या बाळाच्या रूपात २६ डिसेंबरला मुलगी जन्माला आली. त्यानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलमानने आपल्या तिन्ही सलूनमधील कामगारांना याची माहिती दिली.

सलमाननं दिलेल्या माहितीनुसार समाजात लोक मुलगा आणि मुलगी यात खूप फरक करतात. मुलाच्या जन्माचा जास्त आनंद साजरा केला जातो. मुलींच्या बाबतीत असं केलं जात नाही. पण मला मुलगी झाल्यानंतर खूप आनंद झाला. म्हणून मी सगळ्यांना मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला.

मुलींच्या बाबतीत असं केलं जात नाही. पण मला मुलगी झाल्यानंतर खूप आनंद झाला. म्हणून मी सगळ्यांना मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला.