Handstand Challenge : मुलींमध्ये फेमस झालंय 'हे' विचित्र चॅलेन्ज, चुकूनही करून बघू नका महागात पडेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 12:09 IST2020-04-16T12:04:36+5:302020-04-16T12:09:19+5:30

सिमोनने घरात बंद असलेल्या लोकांना एक अजब टास्क दिलाय. तिने लोकांना Handstand Challenge दिलंय.

Handstand Challenge : Olympic champion Simone Bile's video goes viral | Handstand Challenge : मुलींमध्ये फेमस झालंय 'हे' विचित्र चॅलेन्ज, चुकूनही करून बघू नका महागात पडेल...

Handstand Challenge : मुलींमध्ये फेमस झालंय 'हे' विचित्र चॅलेन्ज, चुकूनही करून बघू नका महागात पडेल...

सिमोन बाइल्सचं नाव तुम्ही कधी ऐकलं का? नसेल ऐकलं तर आम्ही सांगतो. सिमोन ही एक ऑलंम्पिक चॅम्पियन आहे. सिमोनने बॅलन्स बीम स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं होतं. सिमोनने घरात बंद असलेल्या लोकांना एक अजब टास्क दिलाय. तिने लोकांना Handstand Challenge दिलंय. यात लोकांना हॅन्डस्टॅन्ड करून पॅंट काढायची आहे.

आपल्या ट्विटर हॅन्डलवर तिने हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यात तुम्ही बघू शकता की, ती कशाप्रकारे हे चॅलेन्ज पूर्ण करत आहे. बराच वेळ तिने प्रयत्न केला. अखेर शेवटच्या काही सेकंदात तिला चॅलेन्ज पूर्ण करण्यात यश येतं.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं हे अजब चॅलेन्ज स्विकारलं. काही मुलींनी चॅलेन्ज पूर्णही केलं. 

बघा आता घरात तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत आहातच. हाही प्रयोग करून बघा.

Web Title: Handstand Challenge : Olympic champion Simone Bile's video goes viral