'याराची यारी'! मित्राच्या लग्नात पठ्ठ्याची रजनीकांत स्टाइल एंट्री; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:15 IST2023-12-12T13:14:49+5:302023-12-12T13:15:39+5:30
मित्राच्या लग्नात रजनीकांतच्या रोबोट 2.0 चित्रपटातील गेटअप करून वेधले नेटकऱ्यांचे लक्ष.

'याराची यारी'! मित्राच्या लग्नात पठ्ठ्याची रजनीकांत स्टाइल एंट्री; Video व्हायरल
Viral video : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. हा क्षण कायम स्मरणात राहावा यासाठी वेगवेगळे प्रकार केले जातात. हे शुभकार्य निर्विघ्न तसेच दिमाखात व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी लगीन घरात लगबग चालु असते. मित्र मंडळी, सगे-सोयरे त्यात भर घालतात ती वेगळीच. असाच एक हटके, लक्ष वेधणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर कहर केला आहे.
आपल्या मित्राच्या आयुष्यातील हा खास क्षण कायम आठवणीत राहावा याकरिता तरूणाने केलेला हटके गेटअपची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. या लग्न समारंभात चक्क रजनीकांत यांच्या रोबोट २.० या सिनेमातील सीन रिक्रिएट करण्यात आला आहे. या तरुणाच्या एंट्रीने लग्न समारंभातील मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नववधु आणि नवरदेव स्टेजवर उभे असताना रोबोट सिनेमातील 'चिठ्ठी' या पात्राची वेशभुषा केलेला तरूण अचानक समोर येतो. या तरुणाच्या स्टाईलने लग्न समारंभातील प्रत्येकजण भारावून गेला आहे. त्यात भर लग्नमंडपात हा तरूण भन्नाट डान्स करतो. त्याचा हा डान्स नेटकऱ्यांच्या देखील पसंतीस उतरला आहे. कमेंट्सचा वर्षाव करत नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वस्ताला चिठ्ठी अशी कमेंट करत एका नेटकऱ्याने या तरुणाची फिरकी घेतली आहे.
येथे पाहा व्हिडीओ :