Video : हत्ती, गाय अन् आता बिबट्याची क्रूर हत्या; दात, नखंही ठेवली नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:53 PM2020-06-08T14:53:51+5:302020-06-08T14:55:09+5:30

गुवाहाटी येथील गोर्चूकमधील काटाहबारी परिसरातील हा प्रसंग आहे.

Guwahati Locals Beat Leopard To Death; Remove Its Teeth, Nails, Pose With Carcass In A Video | Video : हत्ती, गाय अन् आता बिबट्याची क्रूर हत्या; दात, नखंही ठेवली नाहीत!

Video : हत्ती, गाय अन् आता बिबट्याची क्रूर हत्या; दात, नखंही ठेवली नाहीत!

Next

संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना आपल्याला ऐकीकडे माणूसकीचं दर्शन घडत असताना दुसरीकडे हाच माणून निर्सगावर हक्क असलेल्या प्राण्यांची हत्या करताना दिसत आहे. केरळमधील गर्भवती हत्तीण, हिमाचल प्रदेशमधील गर्भवती गाय यांच्यानंतर आता माणुकीचा अंत झाल्याची प्रचिती देणारा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुवाहाटी येथील हा व्हिडीओ आहे आणि त्यात लोकं किती क्रूर असू शकतील याची प्रचिती येत आहे.

गुवाहाटी येथील गोर्चूकमधील काटाहबारी परिसरातील हा प्रसंग आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत काही स्थानिक लोक एका बिबट्याच्या मृत शरिरासह डान्स करताना आणि फोटो काढताना दिसत आहेत. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार या स्थानिकांनी बिबट्याची निर्दयीपणे हत्या केली आणि दात अन् नखही ठेवली नाही. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून दुसऱ्या आरोपींचा तपास सुरू आहे.


 याच घटनेला दुजोरा देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मोहम्मद जुबैर याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत ही लोकं बिबट्याच्या मृतदेहासह डान्स करताना दिसत आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या 90 वर्षीय पैलवानानं केलं कोरोनाला चीतपट; 19 दिवसांनंतर परतले घरी 

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!

Video : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर डेव्हिड वॉर्नर बनला 'या' डान्सरचा जबरा फॅन; तुम्हीही पडाल प्रेमात

न्यूड फोटोनंतर मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला पार्टीतला Video; ट्रोलर्संना सुनावले खडे बोल!

OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

धक्कादायक; Racing Carमध्ये इतिहास घडवणारी महिला रेसर बनली 'Porn Star', अन्...

Web Title: Guwahati Locals Beat Leopard To Death; Remove Its Teeth, Nails, Pose With Carcass In A Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.