OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 11:05 AM2020-06-08T11:05:19+5:302020-06-08T11:07:19+5:30

जून महिन्याच्या मध्यंतराला ते मुंबईत दाखल होणार आहेत.

OMG : Private Jet Hired For Rs 9.06 Lakh To Fly Pets From Delhi To Mumbai | OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

Next

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून देशांतर्गत वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. त्यामुळे स्थलांतरीत मजूरांना पायी प्रवास करावा लागला होता. पण, केंद्र व राज्य सरकारनं श्रमिक ट्रेन सुरू करून मजूरांना आपापल्या गावी पाठवण्यात येत आहे. त्यानंतर आता देशांतर्गत विमानसेवाही काही अंशी सुरू झाल्या असून त्यातूनही मजूरांना पाठवण्यात येत आहेत. पण, आज एक असा प्रसंग तुम्हाला सांगणार आहोत की, ती आणि त्यासाठी झालेला खर्च ऐकून तुम्हाला चक्कर नक्की येईल.

लॉकडाऊनमध्ये नवी दिल्ली येथे अडकलेल्या पाळीव कुत्र्यांना चक्क प्रायव्हेट जेट्सनं मुंबईत आणण्यात येणार आहे. जून महिन्याच्या मध्यंतराला ते मुंबईत दाखल होणार आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना देशाच्या विविध भागात अडकून पडावं लागले. यात प्रवास नियमांमुळे अनेकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना सोडून प्रवास करावा लागला.  पाळीव प्राण्यांमुळे कोरोनाचा प्रसार होतो, असे सांगण्यात आले होते. पण, आता मालक आणि पाळीव प्राण्यांची झालेली ताटातूट दूर करण्यासाठी उद्योजिका आणि सायबर सुरक्षा संशोधक दीपिका सिंग यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मालक व त्यांच्या पाळीव प्राण्यांची भेट घडवण्याचा निर्धार केला आहे. 'मुंबई मिरर' ने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

मुंबईतील 25 वर्षीय दीपिका यांनी सांगितले की,''काही लोकांना त्यांच्या पाळीव प्राण्यांसह प्रवास करायचा होता, परंतु काहींनी नकार दिला. त्यामुळे पाळीव प्राण्यांसाठी जेटची सोय करण्याचा मी निर्णय घेतला आहे. या जेट्समधून कुत्रे, पक्षी आणि अन्य पाळीव प्राण्यांना आणण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे ते नवी दिल्लीत अडकले होते.'' 

दीपिकानं या संदर्भात अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅक्रेशन एव्हिएशन यांच्याशी चर्चा सुरू आहे. सहा सीटर जेट बूक करण्यात आले आहे आणि त्यासाठी 9.06 लाख मोजण्यात येणार आहे. प्रत्येकी सीटसाठी 1.6 लाख रुपये चार्ज केले जाणार आहेत. ''खासगी कंपनीशी चर्चा केली असून त्यांनी या पाळीव प्राण्यांना पाठवण्याची तयारी दर्शवली आहे,''असे दीपिकानं एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. आतापर्यंत चार मालकांनी बुकींग केलं आहे. त्यात दोन Shih Tzu, 1 Golden Retriever अशा तीन कुत्र्यांसह एका पक्षीचा समावेश आहे.

MS Dhoniच्या ट्रॅक्टर खरेदीवर आनंद महिंद्रा म्हणतात...; व्हायरल होतोय ट्विट 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!

Web Title: OMG : Private Jet Hired For Rs 9.06 Lakh To Fly Pets From Delhi To Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.