फिरत्या झुल्यात अडकले तरुणीचे केस; तात्काळ केली सुटका, पाहा धक्कादायक Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 21:03 IST2023-10-03T21:02:49+5:302023-10-03T21:03:49+5:30

थोडा उशीर झाला असता तर त्या तरुणीसोबत मोठी घटना घडली असती.

Gujarat-viral-video-girls-hair-got-stuck-in-the-giant-wheel-video-went-viral | फिरत्या झुल्यात अडकले तरुणीचे केस; तात्काळ केली सुटका, पाहा धक्कादायक Video...

फिरत्या झुल्यात अडकले तरुणीचे केस; तात्काळ केली सुटका, पाहा धक्कादायक Video...

Ferris Wheel Mast In Gujarat: गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीचे केस जत्रेतील झुल्यात अडकले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका तरुणीचे केस उंच झुल्याच्या लोखंडी रॉडमध्ये अडकल्याचे दिसत आहे. तसेच, काही तरुण वर चढून तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

तरुणी जत्रेतील झुल्यात बसली होती, यावेळी झुला वर गेल्यानंतर तिचे केस झुल्यात अडकले. यावेळी तात्काळ झुला थांबवण्यात आला. झुला चालवणारे काही तरुण वर चढले आणि त्या तरुणीचे केस कापून तिचा जीव वाचवला. यावेळी थोडाही उशीर झाला असता, तर त्या तरुणीसोबत मोठी घटना घडली असती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

@amazingdwarka या हँडलने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या इंस्टाग्राम पेजनुसार ही घटना खंभलियाच्या जत्रेत घडली आहे. हा व्हिडिओ 21 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला होता. शेअर केल्यापासून व्हिडिओला 25.7 मिलियन व्ह्यू मिळाले आहेत. या घटनेविषयी अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Web Title: Gujarat-viral-video-girls-hair-got-stuck-in-the-giant-wheel-video-went-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.