'मैं तेरी हो गई' गाण्यावर थिरकली वधू अन् वराच्या डोळ्यांत आलं पाणी, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:48 PM2021-10-18T15:48:44+5:302021-10-18T15:49:25+5:30

Groom Tears Up As Bride Dance Performance : वेड अबाऊट या इन्स्टाग्राम अकाऊंटने शेअर केलेल्या एका क्लिपमध्ये एक वधू 'सरदार का ग्रँडसन' या चित्रपटातील 'मैं तेरी हो गई' या गाण्यावर डान्स केला आहे.

Groom Tears Up As Bride Dedicates Dance Performance For Him, Viral Video | 'मैं तेरी हो गई' गाण्यावर थिरकली वधू अन् वराच्या डोळ्यांत आलं पाणी, व्हिडिओ व्हायरल

'मैं तेरी हो गई' गाण्यावर थिरकली वधू अन् वराच्या डोळ्यांत आलं पाणी, व्हिडिओ व्हायरल

Next

लग्नात 'मैं तेरी हो गई' या गाण्यावर वधूने डान्स केला. हा डान्स पाहून नवरदेव भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. दरम्यान, लग्नातील ही क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये वधू 'मैं तेरी हो गई' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर वधूचा डान्स पाहिल्यानंतर नवरदेव आपल्या भावनांना थांबवू शकला नाही आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. (Groom tears up as bride dances to Main Teri Ho Gayi during wedding festivities, Viral video)

वेड अबाऊट या इन्स्टाग्राम अकाऊंटने शेअर केलेल्या एका क्लिपमध्ये एक वधू 'सरदार का ग्रँडसन' या चित्रपटातील 'मैं तेरी हो गई' या गाण्यावर डान्स केला आहे. वधू निळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये खूप सुंदर दिसत असून ती डान्स करत आहे. या डान्सदरम्यान नवरदेव सुद्धा क्लिपमध्ये दिसत आहे, तो आधी हसला, पण त्याला अश्रू आवरता आले नाहीत.

वधूचा डान्स पाहून नवरदेव भावूक झाला. त्यानंतर वधूने नवरदेवाला त्याचा हात धरून स्टेजच्या दिशेने नेले आणि त्याचे अश्रू पुसले. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. 'जर हे #CoupleGoals नसेल तर आम्हाला माहित नाही, ते काय आहे!' असे एकाने म्हटले आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी  नवरदेवाचे खूप कौतुक केले. 'मैं तेरी हो गई' हे 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरदार का ग्रँडसन' चित्रपटातील एक गाणे आहे. हे गाणे मिलिंद गाबा आणि पल्लवी गाबा यांनी गायले होते आणि संगीतही त्यांनीच दिले होते. तर हे गाणे मिलिंद गाबा, तनिष्क बागची आणि हॅपी रायकोटी यांनी लिहिले आहे.

Web Title: Groom Tears Up As Bride Dedicates Dance Performance For Him, Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app