पैसे मागणाऱ्या मेहुण्यांना नवरदेवाने दिलं असं उत्तर की मेहुण्या लाजून लाल झाल्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:22 PM2021-09-27T12:22:08+5:302021-09-27T12:22:25+5:30

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पैसे मागणाऱ्या मेहुण्यांना नवरदेवाने असे काही उत्तर दिले की मेव्हण्या लाजल्याच...

groom funny answer to sisterinlaws asking money goes viral | पैसे मागणाऱ्या मेहुण्यांना नवरदेवाने दिलं असं उत्तर की मेहुण्या लाजून लाल झाल्या....

पैसे मागणाऱ्या मेहुण्यांना नवरदेवाने दिलं असं उत्तर की मेहुण्या लाजून लाल झाल्या....

Next

 लग्नाच्या विविध मजेशी प्रथांमध्ये प्रथा आहे, ज्यात नवरदेव लग्नासाठी गेटवर येताच मेहुण्या त्याला थांबवतात आणि पैसे घेतल्याशिवाय आतमध्ये प्रवेश देत नाहीत. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पैसे मागणाऱ्या मेहुण्यांना नवरदेवाने असे काही उत्तर दिले की मेव्हण्या लाजल्याच...

व्हि़डिओमध्ये पाहायला मिळतं, की वरात येताच घरातील सर्व मुली दरवाज्यात जाऊन उभा राहतात. इथे येऊन त्या नवरदेवाला म्हणतात, की राजा बनून आले आहात तर थोडे आमचे हातही ओले करा. या तरुणी नवरदेवाकडे पैशाची मागणी करत असतात. नवरदेवही अगदी मजेशीर अंदाजात त्यांना उत्तर देतो. नवरदेव म्हणतो, त्याचं असं आहे की पैसे मेहनतीनं मिळतात. मी आता थकलोय.. माझे खांदे दाबा, पाय दाबा. मग पैसे मिळतील. नवरदेवाचं हे उत्तर ऐकून सगळेच हसू लागतात.

हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. सोबतच अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत ३० हजारहून अधिकांनी लाईक केला आहे, तर अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ thehouseofbride पेजवरुन अपलोड केला गेला आहे.

एका यूजरनं या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, की हे चुकीचं आहे. हा तर त्या मुलींचा हक्क आहे. नवीन नवीन काहीतरी गोष्ट आणू नका. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मुलींसोबत असंच व्हायला पाहिजे. यांना प्रत्येकच ठिकाणी पैसे हवे असतात. तिसऱ्या यूजरनं लिहिलं, असे दाजी आम्हाला तर नाही मिळाले, आम्हाला लग्नाच्या दिवशी पैसे मिळाले होते. इतरही अनेकांनी या मजेशीर व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

Web Title: groom funny answer to sisterinlaws asking money goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.