VIDEO : टल्ली होऊन लग्नात पोहोचला नवरदेव, नवरीने केलं असं काही बघत राहिले सगळे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 15:13 IST2021-07-06T15:07:58+5:302021-07-06T15:13:36+5:30
Social Viral video : या व्हिडीओत नवरदेव दारू पिऊन टल्ली असलेला दिसत आहे. तो इतका दारू प्यायलाय की, त्याला नवरीच्या गळ्यात हारही टाकता येत नाहीये.

VIDEO : टल्ली होऊन लग्नात पोहोचला नवरदेव, नवरीने केलं असं काही बघत राहिले सगळे!
लग्नातील अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Viral Video) अलिकडे बरेच व्हायरल होत आहेत. यात काही विचित्र घटना बघायला मिळतात तर काही घटना अशा असतात ज्या बघून हसू आवरत नाही. अशाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत नवरदेव दारू पिऊन टल्ली (Groom Drunk) असलेला दिसत आहे. तो इतका दारू प्यायलाय की, त्याला नवरीच्या गळ्यात हारही टाकता येत नाहीये.
व्हिडीओत बघू शकता की, नवरदेव धड उभाही राहू शकत नाहीये. तो स्वत:च्या लग्नाच्या दिवशी इतकी दारू प्यायला जणू मित्राच्या लग्नात आहे. दारू पिऊन त्याची हालत खराब झाली आहे. हा व्हिडीओ jaat_k_jokes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. (हे पण वाचा : Viral Video : स्टेजवरच सुटला नवरदेवाचा पायजमा अन् खदकन हसली नवरी....)
लग्नात हार टाकण्याचा रिवाज होत आहे. नवरीने तर नवरदेवाच्या गळ्यात हार घातलाय तर नवरी आता नवरदेवाने हार टाकण्याची वाट बघत आहे. पण नवरदेवाला धड उभंही राहता येत नाहीये. त्याचे दोन मित्र त्याला कसंतरी धरून उभं करतात. तो कसातरी उभा राहतो आणि हार टाकण्याचा प्रयत्न करतो. पण नवरी त्याची ही अवस्था पाहून चिडते आणि हात फेकून देते. नवरदेवालाही ती धक्का देते.