लग्नात सगळ्यांसमोर नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही, बघून सगळ्यांच्या उंचवल्या भुवया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 15:51 IST2024-10-31T15:29:38+5:302024-10-31T15:51:37+5:30
Bride Groom Video:व्हिडिओत नवरदेव मंडपातील स्टेजच्या पायऱ्यांवरच भांगडा करताना दिसत आहे. तर नवरी पायऱ्यांखाली उभी आहे.

लग्नात सगळ्यांसमोर नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही, बघून सगळ्यांच्या उंचवल्या भुवया!
Bride Groom Video: सोशल मीडियावर लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ गमतीदार तर कधी अवाक् करणारे असतात. नवरी किंवा नवरदेवाच्या विचित्र डान्सचे आणि त्यावेळी केलेल्या अजब कृत्यांचे देखील व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक नवरदेवाच्या कारनाम्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नवरदेवाने जे केलं ते पाहून लोक चक्रावून गेले आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @not_a_creative_mind नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओत नवरदेव मंडपातील स्टेजच्या पायऱ्यांवरच भांगडा करताना दिसत आहे. तर नवरी पायऱ्यांखाली उभी आहे.
नवरदेवाला लग्नाचा इतका आनंद झालेला दिसतोय की, त्याने नवरीला खालीच रोखल आणि तिथेच डान्स करू लागला. "सपने में मिलती है" गाण्यावर डान्स करत आहे. इतकंच नाही त्याने पुढे जे केलं ते याहूनही हैराण करणारं आहे. त्याने त्याच्या फेट्याचा कापड नवरीच्या डोक्यावर ठेवला आणि स्वत:ही त्यात शिरला. जे दृश्य पाहून लोकांना वाटलं दोघेही किस करतील. पण असं काही होत नाही. पण या सगळ्या प्रकाराने नवरी नाराज झालेली दिसली.
या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. तर लोकांनी यावर अनेक मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, "आमच्या इथे असे कारनामे करणाऱ्या वरातील शिक्षा मिळते". दुसऱ्याने लिहिलं की, "देवाने नवरीला अशा पुरूषासोबत जीवन जगण्यासाठी शक्ती द्यावी".