लॉकडाऊनमध्ये नवरदेवाचा जुगाड, मक्याच्या शेतातून काढली वरात; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 11:40 AM2021-05-08T11:40:48+5:302021-05-08T11:45:55+5:30

viral video : लॉकडाऊनमध्ये पोलीस कारवाई करतील, या भीतीपोटी काहीजण लपून लग्नकार्य करताना दिसत आहेत.

groom did jugaad, marriage procession taken out in farm internet loves it see viral video | लॉकडाऊनमध्ये नवरदेवाचा जुगाड, मक्याच्या शेतातून काढली वरात; पाहा Video

लॉकडाऊनमध्ये नवरदेवाचा जुगाड, मक्याच्या शेतातून काढली वरात; पाहा Video

Next
ठळक मुद्देआतापर्यंत हा व्हिडिओ ३१ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अनेक राज्यांत सध्या लॉकडाऊन सुरू केला आहे. यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, अशा परिस्थिती ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे. अशा कुटुंबीयांना तर मोठा फटका सहन करावा लागत आहे. तर काही लोकांनी लग्नकार्य पुढे ढकलले आहे. (groom did jugaad, marriage procession taken out in farm internet loves it see viral video)

दुसरीकडे, काही लोक लॉकडाऊनमध्ये कमी पाहुण्यांच्या उपस्थित लग्नकार्ये उरकून घेत आहेत. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलीस कारवाई करतील, या भीतीपोटी काहीजण लपून लग्नकार्य करताना दिसत आहेत. अशात एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ एका लग्नाच्या वरातीचा आहे. ज्यामध्ये वरात मक्याचे पीक असलेल्या शेतातून जात आहे. या वरातीत नवरदेव, बँड आणि पाहुणे दिसून येत आहेत. 

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबत दीपांशु काबरा यांनी लिहिले आहे की, 'मजेशीर वरात'. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मक्याच्या शेतातून बँडसोबत नवरदेव येत आहे. तसेच, लहान मुले आणि महिला या वरातीत दिसत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ भरपूर लोकांनी पाहिला आहे. तसेच, अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ ३१ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

("जगात नाचक्की! मोदींना राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल", शिवसेनेची खोचक टीका)

देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार (Health Ministry of India) देशात गेल्या 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. खळबळ उडविणारा आकडा हा मृतांचा आहे. देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आजपर्यंत 2,18,92,676 कोरोनाबाधित साप़डले आहेत. यापैकी 1,79,30,960 बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2,38,270 वर गेला आहे. सध्या देशात 37,23,446 रुग्ण उपचार घेत आहेत. 
 

Web Title: groom did jugaad, marriage procession taken out in farm internet loves it see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.