शाब्बास रे पठ्ठ्या! लग्नात नवरदेवाने नवरीला वाकून नमस्कार केला, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मिळालं सडेतोड उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 13:09 IST2021-06-02T13:07:02+5:302021-06-02T13:09:21+5:30

Social Viral : सामान्यपणे भारतीय परंपरेनुसार, नवरदेव नाही तर नवरी लग्नात नवरदेवाच्या पाया पडते. लोक हा फोटो पाहून हैराण तर झाले आहेतच सोबतच त्यांना प्रश्न पडलाय की, असं का?

Groom bowed down and touched the feet of bride befitting reply on viral photo | शाब्बास रे पठ्ठ्या! लग्नात नवरदेवाने नवरीला वाकून नमस्कार केला, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मिळालं सडेतोड उत्तर...

शाब्बास रे पठ्ठ्या! लग्नात नवरदेवाने नवरीला वाकून नमस्कार केला, प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मिळालं सडेतोड उत्तर...

सोशल मीडियावर एक फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहे. ज्यात एक नवरदेव नवरीच्या पाया पडताना दिसत आहे. हा व्हायरल झालेला फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. कारण सामान्यपणे भारतीय परंपरेनुसार, नवरदेव नाही तर नवरी लग्नात नवरदेवाच्या पाया पडते. लोक हा फोटो पाहून हैराण तर झाले आहेतच सोबतच त्यांना प्रश्न पडलाय की, असं का?

नवरदेव नवरीच्या पाया पडला

ट्विटरवर व्हायरल झालेला हा फोटो डॉ. अजीत वारवंडकर यानी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत असताना त्यांनी मनाला आनंद देणारं एक कॅप्शनही शेअऱ केलं आहे. डॉ. अजीत यांनी लिहिले की, 'वरमाला घालण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर नवरदेव नवरीच्या पाया पडला तेव्हा लग्नात उपस्थित पाहुणे आणि घरातील लोक स्तब्ध झालेत.'.

हा फोटो व्हायरल झाल्यावर त्यांनी नवरदेवाकडून पोस्टमध्ये लिहिले की, 'माझा वंश हीच पुढे नेणार, माझ्या घरची लक्ष्मी म्हटली जाणार. माझ्या आई वडिलांचा सन्मान कऱणारी आणि त्यांची सेवा करणारी, मला वडील होण्याचा आनंद हीच देणार. प्रसुती दरम्यान माझ्या वंशाला जन्म देताना मृत्यूला मात देऊन येणारी. तिच्या वागण्याने समाजात माझी ओळख निर्माण होईल. आई-वडिलांना सोडून माझ्यासाठी ती आली. आपल्यांशी नातं तोडून तिने माझ्याशी नातं जोडलं'.

शेवटी डॉ. अजीत वारवंडकर यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'जेव्हा ती इतकं सगळं करू शकते तर आपण काय थोडा सन्मानही देऊ शकत नाही. महिलांच्या पाया पडणं हास्य असेल तर मला जगाची पर्वा नाही'.
 

Read in English

Web Title: Groom bowed down and touched the feet of bride befitting reply on viral photo