VIDEO : रसगुल्ला खाऊ घालण्याच्या नादात चुकून मेहुणीने नवरदेवाला केलं kiss आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 01:39 PM2022-07-29T13:39:02+5:302022-07-29T13:39:20+5:30

Funny Video: व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव स्टेजवर बसले आहेत आणि त्यांच्यासमोर सर्व मेहुण्या येतात. त्यातील एक फार हुशार असते. ती तिच्या भाओजीसाठी रसगुल्ला आणते.

Groom and saali video : Jija saali funny kissing scene during wedding | VIDEO : रसगुल्ला खाऊ घालण्याच्या नादात चुकून मेहुणीने नवरदेवाला केलं kiss आणि मग...

VIDEO : रसगुल्ला खाऊ घालण्याच्या नादात चुकून मेहुणीने नवरदेवाला केलं kiss आणि मग...

googlenewsNext

Jija Saali Funny Video: लग्नात जर सर्वात जास्त मस्ती करणारी जोडी कुणी असेल तर ती आहे मेहुणी आणि भाओजीची जोडी. ते एकमेकांची गंमत करण्याचे अनेक कारणे शोधत असतात. मेहुणी तर नवरदेवाच्या एन्ट्रीपासून ते शूज लपवण्यापर्यंत आपल्या भाओजीला त्रास देत असते. तेच काही भाओजीही काही कमी नसतात. तेही आपल्या मेहुणीला त्रास देण्यासाठी काहीना काही बहाना शोधत असतात. अनेकदा भाओजी आणि मेहुणीतील गमतीदार वादही स्टेजवर बघायला मिळतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव स्टेजवर बसले आहेत आणि त्यांच्यासमोर सर्व मेहुण्या येतात. त्यातील एक फार हुशार असते. ती तिच्या भाओजीसाठी रसगुल्ला आणते. मेहुणी रसगुल्ला हातात घेऊन उभी आहे आणि वाट बघत आहे की, तो खाण्यासाठी नवरदेव कधी पुढे येईल. जसा मेहुणीने रसगुल्ला भरवण्यासाठी हात पुढे केला नवरदेवाने तिचा हात पकडला आणि आपल्याकडे तिला खेचलं. नवरदेवाने रसगुल्ला खाण्याचा प्रयत्न तर केला पण त्यात त्याला यश मिळालं नाही.

मेहुणीही फार चतुर दिसते. तिनेही नवरदेवाला रसगुल्ला खाऊ दिला नाही. अखेर असा सीन बनला ज्याबाबत कुणी विचारही केला नसेल. रसगुल्ल्याच्या नादात मेहुणी आणि नवरदेवाने एकमेकांना किस केलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ फार व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळत आहे आणि लोक वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत आहेत.

Web Title: Groom and saali video : Jija saali funny kissing scene during wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.