द ग्रेट खलीने तरूणपणीचा भारी फोटो केला शेअर, लोक म्हणाले - Godzilla ला एक फाइट मारून ये....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 17:06 IST2021-05-28T17:06:25+5:302021-05-28T17:06:33+5:30

हा आहे तो फोटो जो त्याने नुकताच इन्स्टावर शेअऱ केला आणि ज्याची लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. हा फोटो पाहिल्यावर लक्षात येतं की, खली आता आता नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून वर्कआउट करत आहे.

The great Khali pics of his young days goes viral | द ग्रेट खलीने तरूणपणीचा भारी फोटो केला शेअर, लोक म्हणाले - Godzilla ला एक फाइट मारून ये....

द ग्रेट खलीने तरूणपणीचा भारी फोटो केला शेअर, लोक म्हणाले - Godzilla ला एक फाइट मारून ये....

द ग्रेट खलीला तुम्ही फाइट करताना अनेकदा पाहिलं असेल. त्याचं इन्स्टाग्रामही तुम्ही पाहिलं असेल आणि त्याचे फनी व्हिडीओजही पाहिले असतील. इतकंच काय तर त्याचा डाएट प्लानही तुम्हाला माहीत असेल. पण एक गोष्ट बघायची राहिली असेल. ती म्हणजे द ग्रेट खलीची तो द ग्रेट बनण्याआधीचा तरूणपणीचा फोटो. खलीने त्याचा तरूणपणीचा फोटो शेअऱ केला आहे.

हा आहे तो फोटो जो त्याने नुकताच इन्स्टावर शेअऱ केला आणि ज्याची लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. हा फोटो पाहिल्यावर लक्षात येतं की, खली आता आता नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून वर्कआउट करत आहे. त्याने यात कमरेवर हात ठेवून पोज दिली आहे. ज्यात त्याची कमाल बॉडीही दिसत आहे. 

आता त्याचा हा फोटो पाहून लोकांनी काही मजेदार कमेंट करणंही सुरू केलं आहे. एकाने लिहिले की, एका हात मारून गॉडजिलाला जखमी कर ना. तर एकाने लिहिले की, सर आमच्या गावात टॉवर नाहीय. तर काही लोकांनी खलीच्या मेहनतीचं कौतुकही केलं आहे. 
 

Web Title: The great Khali pics of his young days goes viral