अरेरे! 2 दिवसांपासून उपाशी आजी गोठ्यातच पडून; कोणीच मदतीला नाही, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 02:13 PM2021-05-16T14:13:57+5:302021-05-16T14:33:08+5:30

घरातील सर्वजण कोरोना बाधित असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर घरात एकट्याच राहिलेल्या वयोवृद्ध आजींचे प्रचंड हाल झाले.

Grandmother lying in herd without food and water for 2 days heart wrenching video beed news | अरेरे! 2 दिवसांपासून उपाशी आजी गोठ्यातच पडून; कोणीच मदतीला नाही, पाहा व्हिडीओ

अरेरे! 2 दिवसांपासून उपाशी आजी गोठ्यातच पडून; कोणीच मदतीला नाही, पाहा व्हिडीओ

Next

गेल्या दोन महिन्यांपासून भारतभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर (Corona cases in Maharashtra)  केला आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आहे.  लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा माणसांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे कोणीच कोणाला मदत करायला तयार नाही. अशातच एक हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे. 

बीड जिल्ह्यातील नाळवंडी याठिकाणी एक घटना घडली आहे. घरातील सर्वजण कोरोना बाधित असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर घरात एकट्याच राहिलेल्या वयोवृद्ध आजींचे प्रचंड हाल झाले. आजी घरात एकट्याचं असल्यानं त्यांना स्वतःसाठी जेवणही बनवता आलं नाही. जवळपास दोन दिवस अन्न पाण्याशिवाय या आजी घराबाहेर बसून होत्या.  दोन दिवसांपासून आजूबाजूचं कोणीही आजींची मदत करायला आलं नाही.  कमालच झाली राव! कोंबडा बोलू लागला अल्लाह अल्लाह; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

गावातील रहीवासी विजयसिंह  हे घटनास्थळी  पोहोचले आणि आजींना मदत केली. गावातील चार ते पाच लोकांनी त्यांना उचलून रुग्णालयात नेलं. आधी त्यांना खायला प्यायला दिले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून अनेकांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. माणुसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडीओ अनेकांसाठी आदर्श ठरला आहे. मुलाच्या तोंडातलं छिद्र पाहून घाबरली आई; डॉक्टरांनी लक्षात आणून दिली मोठी चूक

Web Title: Grandmother lying in herd without food and water for 2 days heart wrenching video beed news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.