ट्रस्ट चॅलेंजच्या नादात तिनं उंच झाडावरनं मारली उलटी उडी, बॉयफ्रेंड झेलायला गेला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 11:30 IST2021-08-25T11:27:04+5:302021-08-25T11:30:15+5:30

अनेक कपल ट्रस्ट चॅलेंज गेमही (trust challenge game)खेळतात. या अशा विचित्र गेम मध्ये काहीवेळा अशी रिस्क असते ती दोघांपैकी एकाच्या जीवालाही धोका असू शकतो. हा व्हिडिओही अशाच प्रकारचा आहे. यात ट्रस्ट गेम जिंकण्यासाठी कपलनं काय केलंय पाहा.

girlfriend jump from the tree for trust challenge boyfriend catches her, video goes viral | ट्रस्ट चॅलेंजच्या नादात तिनं उंच झाडावरनं मारली उलटी उडी, बॉयफ्रेंड झेलायला गेला अन्....

ट्रस्ट चॅलेंजच्या नादात तिनं उंच झाडावरनं मारली उलटी उडी, बॉयफ्रेंड झेलायला गेला अन्....

प्रेमात विश्वास अत्यंत महत्त्वाचा. पण हा विश्वास सिद्ध करण्यासाठी अनेक कपल ट्रस्ट चॅलेंज गेमही (trust challenge game)खेळतात. या अशा विचित्र गेम मध्ये काहीवेळा अशी रिस्क असते ती दोघांपैकी एकाच्या जीवालाही धोका असू शकतो. हा व्हिडिओही अशाच प्रकारचा आहे. यात ट्रस्ट गेम जिंकण्यासाठी कपलनं काय केलंय पाहा.

यामध्ये एक तरुणी झाडाच्या उंचावर उभी आहे. तर तिचा बॉयफ्रेंड झाडाच्या खाली उभा आहे. तरुणी बॉयफ्रेंडच्या दिशेने पाठ करून उभी आहे आणि ती स्वतःला झाडावरून उलट्या दिशेने झोकून देते. म्हणजे ती एकप्रकारे उंच उडी मारते. त्याचवेळी खाली असलेला तिचा बॉयफ्रेंड आपले दोन्ही हात वर करून तिला आपल्या हातांमध्ये झेलतो.

end_gallbaat1 इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी तरुणाचं कौतुक केलं आहे तर काही जणांनी या कपलचं कृत्य म्हणजे वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे. मुलीला पकडताना जर मोठी दुर्घटना झाली असती तर काय झालं असतं, अशी चिंता बहुतेकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: girlfriend jump from the tree for trust challenge boyfriend catches her, video goes viral