दगाबाज बॉयफ्रेन्डला भर पार्टीतच शिकवला गर्लफ्रेन्डने धडा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 12:36 IST2019-01-22T12:33:51+5:302019-01-22T12:36:29+5:30

एका बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला दगा दिला आणि तिने त्याला असा काही धडा शिकवला की, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल.

Girlfriend dumps cheating boyfriend at her birthday party gives incredible speech | दगाबाज बॉयफ्रेन्डला भर पार्टीतच शिकवला गर्लफ्रेन्डने धडा, व्हिडीओ व्हायरल

दगाबाज बॉयफ्रेन्डला भर पार्टीतच शिकवला गर्लफ्रेन्डने धडा, व्हिडीओ व्हायरल

अलिकडे प्रेमात जोडीदाराला दगा देणे एक सामान्य बाब झाली आहे. याचे वेगवेगळे परिणामही दगा देणाऱ्यांना भोगावे लागत आहेत. आता हेच बघा ना... एका बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला दगा दिला आणि तिने त्याला असा काही धडा शिकवला की, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. टेक्सासमधील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या महिलेने तिच्या बर्थडे पार्टीमध्येच सर्वांसमोर बॉयफ्रेन्डची पोलखोल केली आणि त्याला तिथून हाकलून लावले. 

टियाना असं या महिलेचं नाव असून तिने जे केलं आणि ज्या पद्धतीने केलं त्यासाठी सोशल मीडियातून तिचं कौतुक केलं जातय. दोन मिनिटे २० सेकंदाचा हा व्हिडीओ टियानाने शेअर केला आहे. बर्थडे पार्टीतच तिने बॉयफ्रेन्डसोबत ब्रेकअपची घोषणा केली. टियानाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'जर तुमचा बॉयफ्रेन्ड तुम्हाला दगा देत असेल, तर काय करायला हवं?

या व्हिडीओमध्ये टियानाचा बॉयफ्रेन्ड तिच्या सोबतच उभा आहे..... पार्टी सुरु आहे.... टियानाचे मित्र आणि मैत्रिणीही आहेत.... सर्वातआधी तर टियानाने पार्टीत येण्यासाठी सर्वांचे आभार मानले. पण पुढे ट्विस्ट येतो.... टियाना बॉयफ्रेन्डकडे बघत त्याला धन्यवाद देते. ती बोलू लागते की, 'मी सॅंटॉसचे आभार यासाठी मानते कारण त्याने मला याची जाणीव करून दिली की, मला यापेक्षा चांगलं कुणीतरी मिळू शकतं. कारण इथे असलेल्या प्रत्येक सिंगल व्यक्तीला हे माहीत आहे की, तुला दुसऱ्याच मुलीसोबत संबंध ठेवायचे होते'.


टियाना पुढे सांगते की, 'माझ्याकडे सर्व स्क्रीनशॉट्स आहेत....ज्यात तू त्या मुलीसोबत अश्लिल बोलत होतास आणि व्हिडीओ पाठवत होतास. इतकं सांगूणही तुला कळत नसेल, तर मी हे सांगते की, आपल्यात आता काहीही राहिलेलं नाहीये. तू इथून बाहेर जाऊ शकतोस'.

इतक्यातच टियानाचा एक मित्र वरून सॅंटॉसची बॅग घेऊन येतो. सॅंटॉस ती बॅग घेऊन घराबाहेर जातो. सोशल मीडिया यूजर्सने टियानाच्या हिंमतीचं कौतुक केलंय. हा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झालाय. 

Web Title: Girlfriend dumps cheating boyfriend at her birthday party gives incredible speech