धावत्या रेल्वेच्या गेटमध्ये रील बनवत होती तरूणी, अचानक झाडाला लागली टक्कर आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:31 IST2024-12-12T15:29:37+5:302024-12-12T15:31:14+5:30

Viral Video : एक महिला चालत्या रेल्वेच्या दारात रील बनवत होता. पण तिच्यासोबत अचानक असं काही घडतं जे बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Girl was making reel on gate of running train see what happen next | धावत्या रेल्वेच्या गेटमध्ये रील बनवत होती तरूणी, अचानक झाडाला लागली टक्कर आणि मग...

धावत्या रेल्वेच्या गेटमध्ये रील बनवत होती तरूणी, अचानक झाडाला लागली टक्कर आणि मग...

Viral Video : सोशल मीडियावर फेस होण्यासाठी लोक नको नको त्या गोष्टी करत असतात. काही लोक तर अशा गोष्टी करतात ज्या बघून हैराण व्हायला होतं. कधी कधी तर लोक रील बनवण्यासाठी जीवघेणे स्टंट करतात आणि मग धक्कादायक दुर्घटनाही घडतात. याचंच उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक महिला चालत्या रेल्वेच्या दारात रील बनवत होता. पण तिच्यासोबत अचानक असं काही घडतं जे बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल झालेला व्हिडीओ श्रीलंकेच्या कोलंबोमधील असल्याचं सांगितलं जात आहे. इथे गेल्या रविवारी रेल्वेत प्रवास करत असलेली एक चीनी तरूणी चमत्कारिकपणे वाचली. व्हिडिओत तरूणीने जे केलं ते बघून लोक संताप व्यक्त करत आहेत. तर काही लोकांनी तरूणी सुखरूप रहावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, तरूणी कशाप्रकारे आपला जीव धोक्यात टाकून रील बनवत आहे. रेल्वेच्या पायदानावर उभी राहून बाहेरच्या बाजूने झुकलेली असताना एका झाडाची टक्कर लागते. अशात ती धावत्या रेल्वेतून खाली पडते.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, 'रेल्वे पुढच्या स्टेशनला थांबली होती आणि प्रवासी तिच्या मदतीसाठी परत गेले. महिलेला गंभीर इजा झालेली नाही'.

Web Title: Girl was making reel on gate of running train see what happen next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.