रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 20:13 IST2025-12-28T20:13:04+5:302025-12-28T20:13:49+5:30
प्रत्येकाला आपलं टॅलेंट जगाला दाखवायचं आहे आणि रातोरात 'व्हायरल' व्हायचं आहे. मात्र, काही लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी लोक अनेकदा आपला जीव धोक्यात घालतात.

रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
आजकल रील बनवण्याचं वेड घराघरात पोहोचलं आहे. प्रत्येकाला आपलं टॅलेंट जगाला दाखवायचं आहे आणि रातोरात 'व्हायरल' व्हायचं आहे. मात्र, काही लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी लोक अनेकदा आपला जीव धोक्यात घालतात. अशा काही ठिकाणी उभं राहून रील बनवले जातात, जे पाहूनच अंगावर काटा येतो.
अनेकदा तर रील व्हायरल व्हावी म्हणून लोक मुद्दाम अपघात झाल्याचं देखील नाटक करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी किचनच्या ओट्यावर उभी राहून डान्स करताना दिसत आहे. पण नंतर मुलीसोबत असं काही घडलं जे पाहिल्यावर तुम्हालाही धक्काच बसेल.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी रील बनवण्यासाठी थेट किचनच्या ओट्यावर चढल्याचे दिसतं. ती "दईया दईया दईया रे" या गाण्यावर डान्स करत आहे. विशेष म्हणजे, ज्या ओट्यावर ती नाचत आहे, तिथे गॅसवर दोन्ही बाजूला अन्न शिजत आहे. डान्स संपवून जेव्हा ही मुलगी खाली उतरण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिचा हात गॅसवर ठेवलेल्या पॅनला लागतो आणि त्यातील उकळतं अन्न थेट तिच्या अंगावर आणि जमिनीवर सांडतं.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकरी त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. इन्स्टाग्रामवर @nehashakya706 नावाच्या हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला २.७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने "हे देवा, आता काय काय पाहावं लागणार आहे!" असं म्हटलं आहे.