VIDEO : टॉवेल गुंडाळून रस्त्यांवर फिरत होती तरूणी? बघून लोकांच्या उंचावल्या भुवया आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 13:14 IST2024-08-03T13:04:42+5:302024-08-03T13:14:31+5:30

Viral Video : आता कुणीही टॉवेल गुंडाळून रस्त्यावर आलं तर लोक अवाक् होऊन बघितलच ना...! तेच तनुमितासोबतही झालं.

Girl walks wearing towel Mumbai streets people stunned video viral | VIDEO : टॉवेल गुंडाळून रस्त्यांवर फिरत होती तरूणी? बघून लोकांच्या उंचावल्या भुवया आणि मग...

VIDEO : टॉवेल गुंडाळून रस्त्यांवर फिरत होती तरूणी? बघून लोकांच्या उंचावल्या भुवया आणि मग...

Viral Video :  सोशल मीडियावर रोज काहीना काही अचंबित करणारं व्हायरल होत असतं. वेगवेगळ्या ट्रेन्डवर लोक व्हिडीओ बनवतात. सध्या सोशल मीडियावर 'तौबा तौबा' ट्रेन्ड सुरू आहे. ज्यावर लोक खास डान्स स्टेप्स करत आहे. एका तरूणीनेही याच गाण्यावर रीलवर बनवली आणि तिचा व्हिडीओ पाहून लोकांच्या कपाळावर आठ्या आल्या.

फेमस सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर तनुमिता घोष मुंबईच्या रस्त्यांवर दिसली. पण यावेळी तिने केवळ टॉवेल गुंडाळला होता. आता कुणीही टॉवेल गुंडाळून रस्त्यावर आलं तर लोक अवाक् होऊन बघितलच ना...! तेच तनुमितासोबतही झालं. तिने अंगावर एक गुलाबी रंगाचा टॉवेल गुंडाळला होता आणि भिजलेले केस बांधले होते. असं वाटत होतं जणू ती नुकतीच बाथरूममधून निघाली असेल. मुंबईतील लोक तिचा हा अवतार पाहून 'तौबा तौबा' असंच म्हणत आहेत.

मात्र, व्हिडिओच्या शेवटी एक ट्विस्ट आहे. तो म्हणजे तनुमिता चालता चालता गुंडाळलेला टॉवेल काढून टाकते. तेव्हाच दिसतं की, तिने आत एक सुंदर ड्रेसही परिधान केला आहे. लोक तनुमिताच्या या स्टंटने अवाक् झाले आहेत. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओला १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो लाइक्स मिळाले आहेत आणि शेअरही केला गेला आहे. तसेच शेकडो यूजर्सनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. काही लोकांना तिचा हा स्टंट अजिबात आवडला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. 

नाराजी व्यक्त करणाऱ्या यूजर्सना तनुमिताने उत्तर देत सांगितलं की, हा व्हिडीओ २०१९ मधील एका शोमधील आहे. ज्यात तिला एक खास काम देण्यात आलं होतं. या गोष्टीला फार गंभीरतेने घेतलं जाऊ नये. कारण हा मनोरंजनाचा एक भाग आहे. हा शो सोनाक्षी सिन्हा, शालीना नाथानी, मनीष मल्होत्रा, डिनो मारिया यांच्याद्वारे जज केला जातो. 
 

Web Title: Girl walks wearing towel Mumbai streets people stunned video viral