VIDEO : बाइक चालवताना तरूणीने वर उचललं समोरचं चाक आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 15:19 IST2022-12-30T15:17:07+5:302022-12-30T15:19:48+5:30
Funny Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन तरूणी बाइकवर बसल्या आहेत. बाइक चालवणारी तरूणी अचानक स्पीड वाढवते आणि समोरचं चाक हवेत उचलते.

VIDEO : बाइक चालवताना तरूणीने वर उचललं समोरचं चाक आणि मग...
Funny Video: सोशल मीडियावर तरूणींचे शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यात त्या असे काही कारनामे करतात दिसता की, बघून विश्वास बसत नाही. तरूणींची खिल्लीही उडवली जाते. दोन तरूणींचा असाच एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून लोक पोट धरून हसत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन तरूणी बाइकवर बसल्या आहेत. बाइक चालवणारी तरूणी अचानक स्पीड वाढवते आणि समोरचं चाक हवेत उचलते. पण ती स्पीड कंट्रोल करू शकत नाही. बाइक मागच्या बाजूला पलटी खाते. दोन्ही तरूणी जमिनीवर पडतात.
तरूणींच्या कारनाम्याचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून लोक गंमत करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टावर Ravi Kumar नावाच्या यूजरने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 3 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी अनेक मजेदार कमेंट्सही केल्या आहेत.