Video: तरूणीने खतरनाक किंग कोब्राला आपल्या ओठांनी केलं किस, बघा पुढे काय झालं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:57 IST2022-04-09T13:55:52+5:302022-04-09T13:57:59+5:30
Girl Kissed King Cobra Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत एक तरूणी विशाल किंग कोब्राला आपल्या ओठांनी किस करताना दिसत आहे.

Video: तरूणीने खतरनाक किंग कोब्राला आपल्या ओठांनी केलं किस, बघा पुढे काय झालं!
Girl Kissed King Cobra Video: साप हा पृथ्वीवर आढणाऱ्या सर्वात खतरनाक जीवांपैकी एक मानला जातो. साप दुरूनही दिसला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. सापाला त्रास दिला तर तो हल्ला करतो आणि मग...काही साप इतके विषारी असतात की, त्यांनी दंश करताच व्यक्तीचा जागीच खेळ खल्लास होतो. तरीही काही लोक सापांसोबत खेळ करतात. काही शहाणपणा काही लोकांच्या अंगलटही येतो. पण काहींना हे चांगलं जमतं.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत एक तरूणी विशाल किंग कोब्राला आपल्या ओठांनी किस करताना दिसत आहे. अर्थातच हा नजारा बघायला भयावह आहे. पण तरूणी इतक्या सहजपणे सापाला किस करते जणू ती तिच्या डॉगीला किस करत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारा येत आहे.
व्हिडीओत बघू शकता की, काळ्या रंगाचा किंग कोब्रा फणा काढून मोकळ्या ठिकाणी बसला आहे. अशात एक तरूणी सापाजवळ येते. आधी ती हातांनी सापासोबत खेळते. त्यानंतर आपले ओठ सापाच्या तोंडाजवळ नेते आणि त्याच्या फण्याला आरामात किस करतो. हे ती केवळ एकदा नाही तर दोनदा करते. जे बघून कुणाचीही भंबेरी उडेल. म्हणजे अनेकांना फक्त सापांचा विचार करून भीती वाटते, पण ही तरूणी चक्क त्याला किस करत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे तरूणीने किस केल्यावर सापही शांतपणे बसला आहे. तो जराही हालचाल करत नाही. हा व्हायरल व्हिडीओ rasal_viper नावाच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तेच १५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.