लांब केसांचा खरा फायदा तर 'या' मुलीनेच घेतलाय, मैत्रिणीनेच केली तिची पोलखोल...बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:25 IST2026-03-11T16:23:55+5:302026-03-11T16:25:15+5:30

Viral Video : एका मुलीने लांब केसांना सौंदर्य खुलण्यासाठी नाही तर वेगळ्याच कारणासाठी फायदा घेतला. ज्याचा विचार आपण कदाचित केला नसेल. या मुलीने काय केलं हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.

Girl hide mobile phone on her long hair video goes viral | लांब केसांचा खरा फायदा तर 'या' मुलीनेच घेतलाय, मैत्रिणीनेच केली तिची पोलखोल...बघा व्हिडीओ

लांब केसांचा खरा फायदा तर 'या' मुलीनेच घेतलाय, मैत्रिणीनेच केली तिची पोलखोल...बघा व्हिडीओ

Viral Video : लांब आणि दाट केस हे सौंदर्याचं प्रतीक असतात. प्रत्येक महिलेला किंवा तरूणीला त्यांचे केस लांब असावेत असं वाटत असतं. बऱ्याच महिलांचे किंवा तरूणींचे केस खूप लांब आणि दाट असतात. तर काहींचे कमी लांब आणि पातळ असतात. केस लांब करण्यासाठी महिला वेगवेगळे उपायही करतात. बरं ज्यांचे केस लांब आहेत त्या वेगवेगळ्या हेअर स्टाईल करून आपल्या सौंदर्यात भर घालतात. पण एका मुलीने लांब केसांना सौंदर्य खुलण्यासाठी नाही तर वेगळ्याच कारणासाठी फायदा घेतला. ज्याचा विचार आपण कदाचित केला नसेल. या मुलीने काय केलं हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका शाळेत रेकॉर्ड करण्यात आला आहे. एक मुलगी शाळेच्या ड्रेसमध्ये दिसते आहे. ती क्लासमध्ये तिच्या सीटवर बसलीये. या मुलीच्या मागच्या सीटवर बसलेली मुलगी समोरच्या मुलीचे केस मोकळे करायला लागते. आधी तर काही कळत नाही की, ती असं का करत आहेत. पण नंतर कारण समोर येतं. मुळात ज्या मुलीचे केस मोकळे केले जात आहेत, तिने एक छोटासा की-पॅड फोन केसांमध्ये लपवून ठेवला होता आणि नंतर केस बांधले होते. कुणालाच हे समजू शकत नव्हतं की, तिने केसांमध्ये फोन लपवून ठेवलाय.


आता आपण जो व्हिडीओ पाहिला तो इन्स्टाग्रामवर___nidhipal__ नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय आणि आतापर्यंत या व्हिडिओला २ लाख ९६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे. इतकंच नाही तर बऱ्याच लोकांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, वाह दीदी वाह. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, इंडिया आहे, इथे काहीही होऊ शकतं. तर तिसऱ्या यूजरने लिहिलं की, एकमेकांची पोलखोल का करताय तुम्ही? 

Web Title : लड़की ने बाल में फोन छिपाया; दोस्त ने खोला राज़ |

Web Summary : वायरल वीडियो में एक स्कूली छात्रा अपने लंबे बालों में कीपैड फोन छुपाती है। उसकी दोस्त छिपे हुए फोन का खुलासा करती है, जो लंबे बालों के एक अनोखे उपयोग को दर्शाता है जिसने कई लोगों को चौंका दिया। इंस्टाग्राम पर वीडियो खूब वायरल हो रहा है।

Web Title : Girl uses long hair to hide phone; friend exposes secret.

Web Summary : A viral video shows a schoolgirl concealing a keypad phone in her long hair. Her friend reveals the hidden phone, showcasing a unique use for long hair that surprised many. The video has gained popularity on Instagram.