बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:43 IST2025-11-17T18:41:31+5:302025-11-17T18:43:16+5:30
Video - सोशल मीडियावर बंजी जंपिंगचा आणखी एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
सोशल मीडियावर बंजी जंपिंगचा आणखी एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. २०-२२ वर्षांची एक मुलगी बंजी जंपिंगसाठी तयार असते. आजुबाजुला उंच पर्वत पाहायला मिळत आहेत. जेव्हा ती मुलगी उडी मारते तेव्हा तिच्यासोबत असं काहीतरी घडतं ज्याची कोणीच कधीही कल्पना केली नसेल.
व्हिडीओमध्ये एक मुलगी बंजी जंपिंगसाठी उभी आहे. तिने हेल्मेट घातलं आहे आणि सुरक्षिततेसाठी तिला दोरीने बांधलं आहे. मात्र व्हिडिओमध्ये दावा केल्याप्रमाणे मुलीला उंच पर्वतावरून उडी मारताच हवेतच हार्ट अटॅक आला. मुलगी हवेत बेशुद्ध पडली आहे आणि तिच्या शरीरात कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यानंतर, सर्वजण वेगाने धावत येतात आणि मुलीला चेक करतात.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मुलगी बेशुद्ध आहे आणि हवेत लटकत आहे. व्हिडिओमध्ये मुलीला हार्ट अटॅक आल्याचा दावा करण्यात आलेला आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हवेतच मुलीचा मृत्यू झाला का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
sunny_editts01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. युजर्स व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने "हे स्क्रिप्टेड आहे कारण मुलीने हातातील कोल्ड्रिंकचा कॅन सोडला नाही" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजरने "जर तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही अशा धोकादायक खेळांमध्ये सहभागी होऊ नये" असा सल्ला दिला आहे.