Viral Video: ओ दिदी! विसरभोळ्या मुलीने स्कुटी सोबत केली अशी गोष्ट जी पाहुन तुम्ही डोक्याला लावाल हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:15 IST2022-04-18T17:10:09+5:302022-04-18T17:15:02+5:30
व्हिडीओमध्ये मुलीने तिच्या एका चुकीमुळे स्वत:ची गाडी तर पडलीच पण समोरच्याची बाईकही पाडली. या व्हिडीओची नेटकरीदेखील मजा घेत आहेत.

Viral Video: ओ दिदी! विसरभोळ्या मुलीने स्कुटी सोबत केली अशी गोष्ट जी पाहुन तुम्ही डोक्याला लावाल हात
तुम्ही सोशल मीडियावर (Viral Video On Social Media) अनेर फनी व्हिडीओ पाहिले असतील. त्यातही मुली दुचाकी वा कार चालवतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. या व्हिडीओमध्ये मुलीने तिच्या एका चुकीमुळे स्वत:ची गाडी तर पडलीच पण समोरच्याची बाईकही पाडली. या व्हिडीओची नेटकरीदेखील मजा घेत आहेत.
काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये मुलीचे कारनामे पाहून नेटकरी मजा घेत आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडीओमध्ये तरुणी रस्त्याच्या किनाऱ्यावर स्कूटी पार्क करताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, मुलगी स्कूटी चालवत येते आणि एका शोरूमच्या बाहेर थांबून स्कूटी पार्क करते.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, मुलगी स्कूटीला स्टँड लावते मात्र तो नीट लावत नाही. त्यामुळे स्कूटी खाली पडते. ती स्कूटी उचलते. मात्र किल्ली काढली नसल्यामुळे दुचाकी समोर उभ्या असलेल्या बाईकला धडकते.