स्कूटी चालवताना मुलीने केला असा पराक्रम, नेटकरी म्हणतायत पापा की परी, जाणून घ्या नेमकं काय घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 17:14 IST2022-11-10T17:10:30+5:302022-11-10T17:14:35+5:30
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या स्कूटी चालवणाऱ्या एका मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेकजण रॅश ड्रायव्हिंग करतात, तर काही जण इतरांची पर्वा करत नाहीत अशी बाईक चालवतात.

स्कूटी चालवताना मुलीने केला असा पराक्रम, नेटकरी म्हणतायत पापा की परी, जाणून घ्या नेमकं काय घडलं!
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या स्कूटी चालवणाऱ्या एका मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेकजण रॅश ड्रायव्हिंग करतात, तर काही जण इतरांची पर्वा करत नाहीत अशी बाईक चालवतात. मुलीचीही अशीच काहीशी ड्राइव्हींग आहे, आता या महिला स्कूटी ड्रायव्हरवर अनेक मीम्स बनवले जात आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही मुलगी स्कूटी चालवताना ब्रेकऐवजी पायांचा वापर करत आहे.
काही वेळात तिच्यासमोर एक कार आल्यावर ती स्कूटीला धडकते. फक्त महिलेचे ड्रायव्हिंग कौशल्य पाहून यूजर्संना तो व्हिडिओ आवडला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर स्कूटी चालवताना दिसत आहे. मात्र यादरम्यान तिचा पाय स्कूटीवरून खाली असल्याच दिसत आहे. ती बाईकला ब्रेक लावण्यासाठी हाताच्या ब्रेकचा नव्हे तर पाय वापरत आहे. पुढ ती मुलगी एका फेरीजवळ येताच, तिथून जाणारी कार पाहून थांबण्याऐवजी ती धडक देते. हे पाहून लोक त् मुलीला पापाची परी म्हणत असल्याचे दिसत आहे.
mr.khansab06 या इंस्टाग्राम हँडलवरून ५ नोव्हेंबरला हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला १ कोटी व्ह्यूज आणि ७ लाख १६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी त्याला प्रतिसाद दिला आहे. काहींनी भन्नट कमेंट केल्या आहेत.