Viral Video: रोड रोमियोने मागितला मोबाईल नंबर, मुलीने दाखवला चपलेचा नंबर, छेड काढताच धू धू धुतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 11:35 IST2022-04-03T11:35:05+5:302022-04-03T11:35:16+5:30
तिने भररस्त्यात या रोडरोमिओची चपलेने धुलाई केली आहे. बिहारच्या छपरामधील ही घटना आहे.

Viral Video: रोड रोमियोने मागितला मोबाईल नंबर, मुलीने दाखवला चपलेचा नंबर, छेड काढताच धू धू धुतले
रस्त्यावर एका मुलीकडून मोबाईल नंबर मागणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने मोबाईल नंबर मागणाऱ्या या रोडरोमियोला आपल्या चपलेचा नंबर दाखवला आहे. तिने भररस्त्यात या रोडरोमिओची चपलेने धुलाई केली आहे. बिहारच्या छपरामधील ही घटना आहे (Boy asking mobile number girl beaten up with chappal).
लहलादपूरच्या जनता बाजारातील ही घटना आहे. हा मुलगा वारंवार तरुणीला त्रास द्यायचा, तिचा पाठलाग करायला, अश्लील कमेंट करायचा असा आरोप तिने केला आहे. एक दिवस त्याने तिचा मोबाईल नंबर मागितला आणि मग तरुणीचा ताबा सुटला. तिने काही तरुणांसोबत मिळून त्याची धुलाई केली. चपलेने त्याला धू धू धुतलं.
मोबाइल नंबर की जगह मिला चप्पल का नंबर... वीडियो छपरा के जनता बाजार का है... आरोप है कि युवक रोज परेशान करता था. वीडियो वायरल है...छपरा से आशुतोष की रिपोर्ट pic.twitter.com/DHYkJ8pcYR
— Prakash Kumar (@kumarprakash4u) April 2, 2022
व्हिडीओत पाहा तर ही मुलगी शालेय गणवेशात दिसते आहे. ती शाळेतील विद्यार्थीनी आहे. तिला त्रास देणारा तरुण सिकिटिया गावातील असल्याचं सांगितलं आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार जनता बाजारात बऱ्याच शैक्षणिक संस्थान आहेत. तिथं शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. असे तरुण रस्त्यावर छेडछाड, अश्लील कमेंट करत असतात. या विद्यार्थीनेने हिंमत करून एका तरुणाला चांगलीच अद्दल घडवली.