Giant lizard : Giant lizard enterd in grocery store horrifying video is viral | Giant lizard : बापरे! दुकानात विशालकाय घोरपड शिरताच लोकांनी दिली खतरनाक रिएक्शन; पाहा थरारक व्हिडीओ

Giant lizard : बापरे! दुकानात विशालकाय घोरपड शिरताच लोकांनी दिली खतरनाक रिएक्शन; पाहा थरारक व्हिडीओ

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका सुपरमार्केटचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एका दुकानात मोठी  घोरपड शिरली आहे. अचानक एवढ्या मोठ्या आकाराच्या घोरपडीला पाहून सगळ्यांचेच डोळे उघडेच राहिले. उपस्थित असलेले लोक हा भयानक प्रकार पाहून भयभीत झाले. या व्हायरल व्हिडीओमध्ये  ही घोरपड सुपरमार्केटमध्ये ठेवलेल्या सामानावर चढलेली दिसून येत आहे. 

हा व्हिडीओ थायलँडच्या ७ इलेव्हन सुपरमार्केटचा असल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी एका सोशल मीडिया युजरनं हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. Jejene Narumpa असं या सोशल मीडिया युजरचं नाव आहे.  या पोस्टला आतापर्यंत  हजारो  रिएक्शन्स मिळाले असून १३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक विशालकाय घोरपड सुपरमार्केटमध्ये शिरली आहे. सामानानं भरलेल्या डब्ब्यावर चढण्याचा ती प्रयत्न करत आहे.  त्याचवेळी काही बॉक्स खाली पडतात. ज्यावेळी सुपरमार्केटमध्ये उपस्थित असलेल्यांना ही घोरपड दिसते, त्यावेळी सगळे लोक आरडाओरड करतात. हा  व्हिडीओ पाहत असतानाही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. कारण एव्हढी मोठी घोरपड दुकानात शिरताना कोणीही कधीही पाहिली नसेल.  नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या   

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Giant lizard : Giant lizard enterd in grocery store horrifying video is viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.