पठ्ठ्याने गॅस संपल्यावर इलेक्टिक शेगडी तर आणली, पण स्वयंपाक करताना जे होतंय ते पाहून वाटेल वाईट...बघा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:45 IST2026-03-14T12:44:56+5:302026-03-14T12:45:37+5:30
Viral Video : गॅस संपल्यानंतर एका व्यक्तीने इलेक्ट्रिक शेगडी आणली, पण त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली. चला जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये नेमके काय दिसते.

पठ्ठ्याने गॅस संपल्यावर इलेक्टिक शेगडी तर आणली, पण स्वयंपाक करताना जे होतंय ते पाहून वाटेल वाईट...बघा व्हिडीओ
Viral Video : इराण आणि इस्त्राइल - अमेरिकेचं युद्ध सुरू असताना देशात गॅस सिलेंडरच्या कथित तुटवड्याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. बऱ्याच ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नसल्याने लोक इलेक्ट्रिक शेगडी किंवा इंडक्शन खरेदी करू लागले आहेत. ज्यामुळे बाजारात इंडक्शनचा देखील तुटवडा जाणवत असल्याची चर्चा आहे. बरेच लोक चुलीवर तर काही लोक इलेक्ट्रिक शेगडीवर स्वयंपाक करू लागले आहेत. यावरून बरेच मजेदार रील्सही व्हायरल झाले आहेत. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आलाय ज्यात एका व्यक्तीला एक वेगळीच अडचण आहे. गॅस संपल्यानंतर एका व्यक्तीने इलेक्ट्रिक शेगडी आणली, पण त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली. चला जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये नेमके काय दिसते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली अडचण सांगताना दिसतो. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, घरातील गॅस संपल्यामुळे त्याने बाजारातून एक इलेक्ट्रिक शेगडी आणली होती.
मात्र जेव्हा त्याने त्या शेगडीवर भाजी बनवण्यासाठी कढई ठेवली, तेव्हा एक धक्कादायक गोष्ट घडली. व्हिडिओमध्ये तो दाखवतो की शेगडीमधून कढईत करंट येत आहे. इतकेच नव्हे तर तो भाजीमध्ये टेस्टर लावूनही दाखवतो आणि टेस्टरची लाईट पेटते. तरूण सांगतो की अशा परिस्थितीत त्याला तिथून घरी परत जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टावर @nir_ajsinghrajput या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “गॅस मिळत नसल्यामुळे आम्ही इलेक्ट्रिक शेगडी विकत आणली, पण त्यातही करंट येत आहे. आता आम्ही काय करू? आजकाल तर खाण्यातही करंट येतोय, हे तर कलियुग आहे.” ही बातमी लिहेपर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले, “New fear unlocked.” दुसऱ्याने लिहिले, “भाऊ, यासाठी वेगळे भांडे वापरायचे असते.” तिसऱ्याने सल्ला दिला, “लाकडी चमचा वापरा.”