Viral Video : नवरदेवाच्या मित्राने नवरीला असं दिलं गिफ्ट की ती लाजून लाल झाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 12:17 PM2021-08-06T12:17:18+5:302021-08-06T12:20:14+5:30

एका पॅकेटच्या आत वेगवेगळे पॅकेट्रस आहेत आणि त्यात शेवटी गिफ्ट आहे. नवरदेवाचा मित्र जेव्हा गिफ्ट काढून नवरीला दाखवतो तर ती लाजते

Funny Wedding video : Bride gets milk bottle as wedding gift from groom friend | Viral Video : नवरदेवाच्या मित्राने नवरीला असं दिलं गिफ्ट की ती लाजून लाल झाली!

Viral Video : नवरदेवाच्या मित्राने नवरीला असं दिलं गिफ्ट की ती लाजून लाल झाली!

googlenewsNext

लग्नात नवरी-नवरदेवाच्या मित्रांची मजा-मस्ती सुरूच असते. परिवारातील सर्व सदस्यांप्रमाणे प्रत्येक रितीरिवाज सोबत राहण्यासोबत मित्र-मैत्रिणी त्यांची गंमत करण्यातही समोर राहतात. सोशल मीडियावरलग्नातील मित्रांच्या गंमतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Bride Groom Video) होत असतात. असाच एक नवरी-नवरदेवाचा (Wedding Video) मजेदार व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत स्टेजवर नवरी-नवरदेवासोबत त्याचे काही मित्र आणि भाऊ उभे आहेत. तेव्हाच नवरदेवाचा एक मित्र नवरीकडे बघून तिच्यासाठी आणलेलं वेडींग गिफ्ट स्वत:च उघडून दाखवत होता. 

एका पॅकेटच्या आत वेगवेगळे पॅकेट्रस आहेत आणि त्यात शेवटी गिफ्ट आहे. नवरदेवाचा मित्र जेव्हा गिफ्ट काढून नवरीला दाखवतो तर ती लाजते. इतक्या मेहनतीनंतर गिफ्ट पॅकेट उघडल्यावर त्यातून एक दुधाची बॉटल निघते, जी बघून नवरी लाजते. इन्स्टाग्राम रीलवर हा व्हिडीओ निरंजन महापात्रा नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये लोक स्मायली कमेंट करत आहेत. सर्वांनाच  हा व्हिडीओ आवडल्याचं दिसतं.
 

Web Title: Funny Wedding video : Bride gets milk bottle as wedding gift from groom friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.