VIDEO : महिला काढत होती सेल्फी, बकरीने मागून येऊन दिला जोरदार दणका आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 13:40 IST2021-03-13T13:30:58+5:302021-03-13T13:40:10+5:30
या व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, एक महिले सेल्फी घेत आहे. तिच्यापासून काही अंतरावर एक बकरी बांधलेली आहे.

VIDEO : महिला काढत होती सेल्फी, बकरीने मागून येऊन दिला जोरदार दणका आणि...
सेल्फीशिवाय तर आता लोकांचं जीवनच अधुरं आहे. काही लोकांमध्ये तर सेल्फीची इतकी क्रेझ राहते की, ते त्यांचं जीवन धोक्यात टाकतात. म्हणूनच सेल्फीमुळे जीव गमवावा लागलेल्यांची संख्या कमी नाही. असो. सेल्फीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक सेल्फीचा फनी व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एक महिला बकरीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण अचानक एक घटना घडते. ही क्लीप पाहून लोक पोटधरून हसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम यूजर thewildcapture ने शुक्रवारी शेअर केला होता. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला की, आतापर्यंत याला ३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूपच पसंत आला आहे. तसेच लोक यावर मेजदार प्रतिक्रियाही देत आहेत. (हे पण बघा : आग लागलेल्या जंगलात अचानक बसरल्या पावसाच्या सरी; आनंदाच्या भरात महिला पोलिसानं धरला ठेका; पाहा व्हिडीओ )
या व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, एक महिले सेल्फी घेत आहे. तिच्यापासून काही अंतरावर एक बकरी बांधलेली आहे. महिलेचा प्रयत्न आहे की, सेल्फीमध्ये बकरी सुद्धा यावी. पण अचानक बकरी धावत येते आणि महिलेच्या डोक्याला जोरदार टक्कर मारते. ज्यामुळे महिलेचं संतुलन बिघडतं. व्हिडीओ पाहून हेच दिसतं की, बकरीला तिच्याोसोबत सेल्फी काढणं आवडलेलं दिसत नाही.