Viral Video: लग्नात नाचता नाचता आउट ऑफ कंट्रोल झाली महिला, मग जे झालं ते पाहून पोट धरून हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 16:39 IST2021-08-30T16:38:50+5:302021-08-30T16:39:08+5:30
एका लग्नात एक महिला अशाचप्रकारे बेधुंद होऊन डान्स करत होती. महिलेला बघून असं वाटतं की, ती नशेत होती. डान्स करता करता ती इकडे-तिकडे जात होती.

Viral Video: लग्नात नाचता नाचता आउट ऑफ कंट्रोल झाली महिला, मग जे झालं ते पाहून पोट धरून हसाल
सोशल मीडियावर जगभरातील अशा गोष्टी बघायला मिळतात की, ज्यांवर विश्वास ठेवणं कठिण होऊ बसतं. काही व्हिडीओ तर असे असतात की, बघणारे बघतच राहतात. तर काही व्हिडीओ बघून लोक राहून राहून पोट धरून हसू लागतात. असाच एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक जोरजोरात हसत आहेत.
लग्नाच्या पार्टीत किंवा एखाद्या कार्यक्रमात अनेक लोक असे असतात जे जास्तच मजा करतात. काही लोक अशाप्रकारे मस्ती करतात की, त्यांना याचंही भान नसतं की, आजूबाजूलाही लोक आहेत. एका लग्नात एक महिला अशाचप्रकारे बेधुंद होऊन डान्स करत होती. महिलेला बघून असं वाटतं की, ती नशेत होती. डान्स करता करता ती इकडे-तिकडे जात होती. अशात नाचता नाचता ती एका खांबावर पडते. ज्यानंतर लोक पोट धरून हसू लागतात. (हे पण बघा : बोंबला! मंडपात बसून नवरदेव खात होता गुटखा, नवरीने घेतली त्याची अशी शाळा की....)
wait for it! 😆🤦♂️🙈pic.twitter.com/55gOd6fWdF
— You Fecking Idiot (@YoufeckingIdiot) August 28, 2021
व्हिडीओ पाहून तुम्हालाही जोरदार हसू आलं असेल. सोबतच विचारही करत असाल की, अशाप्रकारे कोण डान्स करत असेल? पण लोकांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे आणि लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करून मजाही घेत आहेत. ट्विटरवर हा व्हिडीओ '@YoufeckingIdiot' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.