VIDEO : ज्याने आयुष्यात कधी रंग पाहिला नव्हता, त्याची पहिल्यांदा रंग बघितल्यावर अशी होती प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 12:24 IST2021-01-11T12:24:28+5:302021-01-11T12:24:43+5:30

अमेरिकेच्या अटलांटाच्या एका म्युझिक प्रोड्युसर मॅकला त्याच्या मित्रांनी गिफ्ट म्हणून एक करेक्टिव चष्मा दिला. या चष्म्याच्या माध्यमातून त्याने पहिल्यांदा रंग पाहिला.

Friends gift color blind glasses his reaction is priceless | VIDEO : ज्याने आयुष्यात कधी रंग पाहिला नव्हता, त्याची पहिल्यांदा रंग बघितल्यावर अशी होती प्रतिक्रिया...

VIDEO : ज्याने आयुष्यात कधी रंग पाहिला नव्हता, त्याची पहिल्यांदा रंग बघितल्यावर अशी होती प्रतिक्रिया...

काही क्षण इतके सुंदर असतात की,  ते बघून प्रत्येकाला आनंद होईल. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांना आनंद देत आहे. एका कलर ब्लाइंडने पहिल्यांदा रंग बघितला तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती हे या व्हिडीओत आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आणि लोक त्याच्या  आनंदात सहभागी होत आहेत.

अमेरिकेच्या अटलांटाच्या एका म्युझिक प्रोड्युसर मॅकला त्याच्या मित्रांनी गिफ्ट म्हणून एक करेक्टिव चष्मा दिला. या चष्म्याच्या माध्यमातून त्याने पहिल्यांदा रंग पाहिला. मॅकने त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याने त्याच्या मित्रांचे या खास गिफ्टसाठी आभार मानले आहेत.

व्हिडीओत मॅकचा चेहरा बघून आपल्यालाही आनंद होतो. तो रंग बघताच एखाद्या लहान मुलाप्रमाणे उड्या मारू लागतो. तो रंग बघू आश्चर्यचकित होतो आणि आनंदी होतो. त्याने व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले की, 'मी तुम्हाला चॅलेन्ज देतो माझ्यासारखे मित्र कुणाकडेच नसतील'.

मॅकने मेट्रोसोबत बोलताना सांगितले की, 'मला कधीच माहीत नव्हतं की, आधी किती जीवं आणि चमकदार रंग होते. आणि मी माझ्या मित्रांनी मला दिलेल्या सरप्राइजने चकित होतो. कारण मी कधीही याची इच्छा व्यक्त केली नव्हती'.
 

Web Title: Friends gift color blind glasses his reaction is priceless