मित्रमंडळींनी नववधुला दिलं अनोखं गिफ्ट, सर्वजण पाहातच बसले; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 18:00 IST2022-02-04T17:58:21+5:302022-02-04T18:00:00+5:30
आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देणारं लग्न हे सर्वात पवित्र बंधन मानलं जातं. लग्नसोहळा संपन्न झाल्यानंतर वर-वधूला आशिर्वाद देण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी आणि शुभचिंतक व्यासपीठावर येतात.

मित्रमंडळींनी नववधुला दिलं अनोखं गिफ्ट, सर्वजण पाहातच बसले; पाहा VIDEO
आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देणारं लग्न हे सर्वात पवित्र बंधन मानलं जातं. लग्नसोहळा संपन्न झाल्यानंतर वर-वधूला आशिर्वाद देण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी आणि शुभचिंतक व्यासपीठावर येतात. यात मित्रमंडळी आपल्या खास मित्र किंवा मैत्रिणीला असं एखादं गिफ्ट देतात की ज्यानं हास्यकल्लोळ निर्माण होतो. सोशल मीडियात असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिलेही असतील. अशा धमाल व्हिडिओंची जोरदार चर्चा होत असते आणि कमेंट्सचाही पाऊस पडतो. असाच एक धमाल व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
बहुतांश विवाह सोहळ्यांमध्ये नवरदेवाचे मित्रमंडळी काहीतरी हटके किंवा खट्याळ गिफ्ट देऊन टेर उडवताना दिसत असतात. सोशल मीडियात सध्या एका वधूला दिलेल्या गिफ्टची जोरदार चर्चा सुरू आहे. वधूच्या मित्रमंडळींनी तिला एका मोठ्या बॉक्समधून गिफ्ट दिलं आणि ते भर व्यासपीठावरच उघडून पाहायला सांगितलं.
गिफ्ट दिसायला खूप मोठं असलं तरी ते उघडण्यातच वधूला खूप कष्ट घ्यावे लागत होते. बॉक्समध्ये बॉक्स असं करत असंख्या बॉक्स एकात एक केले गेले होते. पण अखेरीस त्या बॉक्समधून जे हाती लागतं ते पाहून वधूच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलून जातात. भल्या मोठ्या बॉक्समध्ये केवळ एक सर्जिकल मास्क या वधुला गिफ्ट म्हणून देण्यात आला होता. गिफ्ट पाहून वधूही हसू लागली आणि उपस्थितांनी धमाल केली.
सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर असंख्य कमेंट्स देखील येत आहेत. व्हिडिओ खरंच खूप मजेशीर होता, पण कुणाच्याही भावनांशी खेळू नये, असं एका युझरनं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युझरनं तुम्ही किती प्रयत्न करा पण मित्र कधीच सुधारत नाही, अशी मजेशीर कमेंट केली आहे.