मुलाने केली वडिलांची पोलखोल, सर्वांसमोर सांगितलं बाथरूममध्ये काय करत होते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 14:39 IST2021-08-27T14:38:58+5:302021-08-27T14:39:21+5:30
'मिरर'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, चार वर्षाचा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत एडिनबर्गमधील एका रेस्टॉरन्टमध्ये डीनरसाठी गेला होता.

मुलाने केली वडिलांची पोलखोल, सर्वांसमोर सांगितलं बाथरूममध्ये काय करत होते!
स्कॉटलॅंडच्या एडिनबर्गमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका चार वर्षाच्या मुलाने सर्वांसमोर हे सांगितलं की, त्याचे वडील बाथरूममध्ये काय करत होते? यानंतर त्याच्या वडिलांना लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागला. मुलाने वडिलांच्या कारनाम्याबाबत डिटेलमध्ये सांगितलं.
'मिरर'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, चार वर्षाचा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत एडिनबर्गमधील एका रेस्टॉरन्टमध्ये डीनरसाठी गेला होता. जिथे त्याने बिलावर पेन्सीलवर लिहिलं की, बाथरूममध्ये त्याचे वडील काय करत होते.
रेस्टॉरन्टच्या स्टाफने बिलावर लहान मुलाने लिहिलेला मेसेज वाचून हैराण झाले. मुलाने रेस्टॉरन्टच्या बिलावर लिहिले होते की, बाबा बाथरूममध्ये गॅस सोडत होते. बिलाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रेस्टॉरन्टच्या कर्मचाऱ्याने सांगितलं की, मुलाचे वडील जेवण झाल्यावर बाथरूममध्ये गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा चार वर्षांचा मुलगाही होता. बाथरूममधून परतल्यावर मुलाने रेस्टॉरन्टच्या बिलावर पेन्सिलने एक नोट लिहिली.
दरम्यान सोशल मीडियावरील लोक या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, मुलगा फारच मस्तीखोर आहे. आई-वडिलांनी त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्यावं. तेच एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, त्याच्या वडिलांना तर काही सुचलच नसेल की, काय करावं?