कोरियन महिलेने पहिल्यांदा नेसली साडी, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले - खूपच सुंदर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 18:29 IST2022-07-26T18:16:49+5:302022-07-26T18:29:53+5:30
Social Media Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका महिला निळ्या रंगाच्या साडीत वॉक करत आहे. कपाळावर टिकली लावली आहे. ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे.

कोरियन महिलेने पहिल्यांदा नेसली साडी, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले - खूपच सुंदर....
Social Media Viral Video : भारतीय संस्कृतीची ओळख साडी आहे. देशातील मोठ्या प्रमाणात महिला साडी नेसतात. असं म्हटलं जातं की, साडीत महिला अधिक सुंदर दिसतात. भारतीय महिलांसोबत काही परदेशी महिलाही साडी नेसतात. सोशल मीडियावर याचाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक कोरियन महिलेने पहिल्यांदाच साडी नेसली आहे. साडी नेसून ती वॉक करताना दिसत आहे. ज्यात ती फारच सुंदर दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक महिला निळ्या रंगाच्या साडीत वॉक करत आहे. कपाळावर टिकली लावली आहे. ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे. या महिलेने इन्स्टाग्रामवर आपला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शनही दिलं आहे. ज्यात तिने लिहिलं आहे की, कोरियात पहिल्यांदा साडी नेसली.
या व्हिडीओला काही तासांमध्येच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर व्हिडीओला 15 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, खरंच तुम्ही खूप सुंदर दिसत आहात वहिनी. एका दुसऱ्याने लिहिलं की, फारच सुंदर, महिला साडीत फार सुंदर दिसतात.