Video: बापरे! नशेच्या धुंदीत महिला वॉशिंग मशिनमध्ये अडकली, बाहेर निघता निघेना, अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 12:28 PM2020-10-05T12:28:41+5:302020-10-05T12:29:50+5:30

Viral Video : आपल्या मित्र मैत्रिणींसह पार्टी करताना या महिलेनं प्रमाणाच्या बाहेर दारू प्यायल्यानं तिला शुद्ध नव्हती. नशेतच ही महिला गमतीने वॉशिंगमध्ये शिरली.

Firefighters rescue drunk girl stuck inside washing machine video viral | Video: बापरे! नशेच्या धुंदीत महिला वॉशिंग मशिनमध्ये अडकली, बाहेर निघता निघेना, अन् मग....

Video: बापरे! नशेच्या धुंदीत महिला वॉशिंग मशिनमध्ये अडकली, बाहेर निघता निघेना, अन् मग....

Next

नशेत असल्यावर माणसं चित्र विचित्र कृत्य करतात, अशी अनेक उदाहरण तुम्ही पाहिली असतील. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला नशेच्या धुंदीत चक्क वॉशिंग मशिनमध्ये अडकली आहे. आपल्या मित्र मैत्रिणींसह पार्टी करताना या महिलेनं प्रमाणाच्या बाहेर दारू प्यायल्यानं तिला शुद्ध नव्हती. नशेतच ही महिला वॉशिंग मशिनमध्ये शिरली. पण बाहेर येण्याचे  मात्र वांदे झाले. कारण कमरेच्या खालचा संपूर्ण भाग मशिनमध्येच फसला होता. बराचवेळ प्रयत्न करूनही बाहेर काढता येत नव्हते.

अनेकदा प्रयत्न करूनही या महिलेला बाहेर काढता येत नसल्यामुळे (फायर फायटर्स) रेस्क्यू टीमच्या जवानांना बोलवण्यात आलं. त्यानंतर या महिलेला बाहेर काढण्यात यश आलं आहे. रोजी कोल नावाची ही महिला २१ वर्षांची आहे. रिपोर्टनुसार मंगळवारी संध्याकाळी ही महिला आपल्या मित्र मैत्रिणींसोबत पार्टीचा आनंद घेत होती. नशेच्या धुंदीत या महिलेनं मशिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पण ही करामत चांगलीच महागात पडली. आपण मोठी चूक केल्याचे नंतर या महिलेच्या निदर्शनास आलं.  Video : नोकरी मिळाल्यावर 'तिला' तूफान आनंद झाला; थेट ऑफिसच्या बाहेर केला डान्स, पाहा व्हिडीओ

रात्री ११ वाजता आपातकालीन सेवेतील कर्मचारी आले आणि त्यांनी या महिलेची त्रासातून सुटका केली. जवळपास २० ते ३० मिनिटं या महिलेला वॉशिंग मशिनमधून बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ tiktab नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ  तुफान व्हायरल होत आहे. रेस्क्यू टीम वेळेवर आल्यामुळे या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.   भारीच! लग्नानंतर पहिल्यांदाच ५८ वर्षांनी केलं फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल १ नंबर जोडी

Web Title: Firefighters rescue drunk girl stuck inside washing machine video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.