Video: Woman reaction after being hired was secretly caught on camera video goes viral | Video : नोकरी मिळाल्यावर 'तिला' तूफान आनंद झाला; थेट ऑफिसच्या बाहेर केला डान्स, पाहा व्हिडीओ

Video : नोकरी मिळाल्यावर 'तिला' तूफान आनंद झाला; थेट ऑफिसच्या बाहेर केला डान्स, पाहा व्हिडीओ

नोकरी मिळाल्यावर प्रत्येकालाच खूप आनंद होत असतो. अनेकांना तर काय करू आणि काय नाही असं होतं. अनेकजण आनंदाच्या भरात वाट्टेल ते करतात. सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. विशेष म्हणजे ऑफिसच्या बाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची रिएक्शन पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. 

हा व्हिडीओ इंस्ट्राग्राम युजर @dakara_spence याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत असताना कॅप्शन दिलं आहे की, ''मी एका तरूण महिलेला नोकरी दिली आणि बाहेर आल्यानंतर तिची रिएक्शन अशी होती. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही मुलही पार्कींगमध्ये उभी राहून डान्स करत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी ऑफिसमधून बाहेर निघते. त्यानंतर पार्कींगजवळ जाऊन उभी राहते आणि इकडे तिकडे बघते. काही सेकंदापर्यंत डान्स करून ती मुलगी निघून जाते.

लोकांना या मुलीचा आनंद पाहून आनंद झाला आहे. हा व्हिडीओ  ३० सप्टेंबरला शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओ ५ लाखांपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. ५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. या व्हिडीओला त्या मुलीने कमेंटही दिली आहे.' तिथे उभं राहून  डान्स करताना कोणतीही मला पाहील, असं मला वाटलं नव्हतं. पण मी चुकीची होते. धन्यवाद. एका युजरनं या मुलीचा उत्साह  पाहून अभिनंदन केलं आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Woman reaction after being hired was secretly caught on camera video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.