केवळ ७ सेकंदात या फोटोतील महिला शोधा! सापडली तर तुम्ही खरे जिनियस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 18:25 IST2022-08-22T18:24:54+5:302022-08-22T18:25:04+5:30

आता या पोपटाच्या फोटोत महिलेला शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोपटाच्या फोटोत महिलेला शोधण्याचीच जणू स्पर्धाच लागली आहे.

find woman in the picture optical illusion picture | केवळ ७ सेकंदात या फोटोतील महिला शोधा! सापडली तर तुम्ही खरे जिनियस

केवळ ७ सेकंदात या फोटोतील महिला शोधा! सापडली तर तुम्ही खरे जिनियस

सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. अशाच एका फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसा एका एका सुंदर पोपटाचा फोटो आहे. पण त्यात एक महिलाही लपलेली असल्याचं सांगितलं जातं आहे. आता या पोपटाच्या फोटोत महिलेला शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोपटाच्या फोटोत महिलेला शोधण्याचीच जणू स्पर्धाच लागली आहे.

तुम्ही फोटो नीट पाहाल तर रंगबेरंगी सुंदर असा पोपट आहे. एका लाकडावर हा पोपट बसला आहे.  लाल, निळा, पिवळा अशा रंगाचा हा पोपट. ज्याचा निम्मा भाग लाल आणि निम्मा भाग निळा आहे. पोपटाच्या शरीराचा डोक्याकडील भाग लाल आहे आणि शेपटीकडील भाग निळा आहे. त्यात मध्ये मध्ये पिवळा, काळा, पांढरा, केशरी असे रंग आहेत.

तसं पाहिलं तर या फोटोत पोपट आणि तो ज्या लाकडावर बसला आहे त्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आहे. अगदी झाडंही नाहीत. पण तरी या फोटोत एक महिला दडलेली असल्याचं सांगितलं जातं आहे. बरेच लोक शोधून थकले आता तुम्ही तुमच्या तीक्ष्ण नजरेने पाहा तुम्हाला ती महिला दिसते आहे का? पण यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेकंदच आहेत बरं का? इतक्या वेळात तुम्हाला ती महिला दिसली तर उत्तम. ती कुठे आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

नाही सापडली का तर आम्ही तुम्हाला एक क्लू  देतो. पोपटाच्या तोंडाकडे नीट पाहा. तुम्हाला तिथं महिलेचा चेहरा दिसेल. बंद डोळे, नाक, ओठ स्पष्ट दिसेल. एकदा हा चेहरा दिसला की तुम्हाला महिला पूर्ण दिसेल. जिने एक हात आपल्या डोक्यावर ठेवला आहे आणि एक त्या दांडीवर. एक पाय तिने दुमडला आहे आणि एक पाय सोडला आहे. खांबावर ती थोडी तिरकी बसली आहे.

आता मात्र तुम्हाला आतापर्यंत दिसलेला पोपट दिसणार नाही ती महिलाच दिसेल. कारण हा पोपट म्हणजेच ही महिला आहे. महिला अशा स्थितीत बसली आहे आणि तिला अशा पद्धतीने रंगवलं आहे, जसा तो खराखुरा बसलेला पोपटच दिसत आहेत. सुरुवातीला हे ओळखणंही अशक्य आहे.

Web Title: find woman in the picture optical illusion picture