Female traffic police officer on duty with her new born baby video went viral chandigarh | Traffic police on duty with her baby : सॅल्यूट! डोक्यावर रणरणतं ऊन, कुशीत चिमुकल्याला घेऊन कर्तव्यावर हजर झाली खाकीतली माऊली

Traffic police on duty with her baby : सॅल्यूट! डोक्यावर रणरणतं ऊन, कुशीत चिमुकल्याला घेऊन कर्तव्यावर हजर झाली खाकीतली माऊली

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात.  पण काही व्हिडीओज किंवा फोटोज इतके बोलके असतात की असे फोटो पाहून सलाम ठोकावासा वाटतो. सध्या सोशल मीडियावर असाच एका महिला पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल  होत आहे.  ज्यामध्ये एक महिला वाहतूक पोलीस अधिकारी (Women traffic Police Officer) आपल्या अवघ्या काही महिन्यांच्या बाळाला (Doing job with her new born baby ) कुशीत घेत घेऊन  कर्तव्यावर हजर झाली आहे. एकाचवेळी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना दिसून येत आहे. 

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बाहेर पडताच अंगाला चटके लागायला सुरूवात होते. अशात भर उन्हात ही महिला पोलिस आपल्या बाळाला घेऊन आपलं कर्तव्य पूर्ण करत आहे.  हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन कौशिक यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, 'मातृत्व आणि कर्तव्याचा संगम.'

हा व्हिडीओ चंदीगड येथील असल्याचं  समोर आलं आहे. हा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय महिला दिन( Women's Day)  काही दिवसांवर आला असताना समोर आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिलां सर्वकाही सांभाळून कर्तव्य बजावण्यास सक्षम असल्याचे दिसून येत आहे. 

बिझनेसमन नवरा नको गं बाई! नागपुरच्या रितेशला १०, २० नाही तर तब्बल ५०० मुलींचा लग्नासाठी नकार

आजूबाजूचे वातावरण, हवामानाची पर्वा न करता ही महिला आपल्या बाळासह कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे  सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव नेटिझन्सकडून करण्यात आला आहे. एका युजरनं प्रतिक्रिया देत, संबंधित महिलेची ड्युटी वाहतूक विभागाच्या ऑफिसमध्ये लावायला हवी,  असा सल्ला दिला आहे. जेणेकरून तिची आणि बाळाची तारांबळ उडणार नाही.

२९ वर्षांत बनला ३५ मुलांचा बाप; स्पर्म डोनरनं सांगितला आपला अनुभव

कारण संबंधित महिला जरी तिचं कर्तव्य पार पाडत असली तरी बाळाला उगाच उन्हात राहावं लागत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास १४ हजार लोकांनी पाहिलं आहे. तर जवळपास दीड हजार लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Female traffic police officer on duty with her new born baby video went viral chandigarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.