सुपरडॅड! फक्त १५ सेकंदात केली मुलीची क्युट हेअरस्टाईल, वडिलांची भन्नाट युक्ती पाहुन नेटकरी अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 14:52 IST2021-10-15T14:52:44+5:302021-10-15T14:52:53+5:30
एक गोड व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. अवघ्या १५ सेंकदात वडिलांनी मुलीची अशी काही हेअरस्टाईल केली की पाहणारे अवाक् झाले.

सुपरडॅड! फक्त १५ सेकंदात केली मुलीची क्युट हेअरस्टाईल, वडिलांची भन्नाट युक्ती पाहुन नेटकरी अवाक्
आजकाल अनेक स्त्रिया रोगजारासाठी घराबाहेर पडतात. अशावेळी वडिलांनी मुलांची जबाबदारी घेणे हे खुप कॉमन झाले आहे. पुर्वी अशी काम सहसा पुरुष करत नसतं. पण कालापरत्वे त्यात बदल झाले. असाच एक गोड व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. अवघ्या १५ सेंकदात वडिलांनी मुलीची अशी काही हेअरस्टाईल केली की पाहणारे अवाक् झाले.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी आरशासमोर उभी आहे. तिचे वडील तिचे केस धरून उभे आहेत. मग वडील आपल्या मुलीला फिरायला जाण्यास सांगतात. मुलीचा आंबाडा घालण्याची ही युक्ती खरोखर भारी आहे. जेव्हा मुलाचा बन तयार होते, तेव्हा वडील त्याला रबर बँडही बांधतात. अशाप्रकारे वडिलांनी अवघ्या १५ सेकंदात आपल्या मुलीचा छोटासा आंबाडा घातला आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर collins_grigsby नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सना खूप आवडत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, अनेकजण त्यावर सतत मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकाला हा हेअरस्टाईल जुगाड खूप आवडला आहे.
एका नेटकऱ्याने कमेंट केली की, खूप गोंडस, मुलगी आधी किती अस्वस्थ होती पण तिच्या वडिलांनी तिला बन घालून देऊन तिला आनंदी केले. त्याचवेळी, दुसर्याने लिहिले आहे, ही युक्ती खरंच भन्नाट आहे, मी पण प्रयत्न करेन. बहुतेक जण इमोजी वापरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.