लेकाच्या आठवणीत बापाने ६ कोटींची लक्झरी कार जमिनीत पुरली; काळजात चर्र करणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:46 IST2026-02-16T16:45:56+5:302026-02-16T16:46:20+5:30

वडिलांनी आपल्या मुलाला वाढदिवसानिमित्त 'सरप्राईज गिफ्ट' म्हणून ही BMW कार दिली होती.

father buries rs 6 crore bmw near son grave emotional viral video | लेकाच्या आठवणीत बापाने ६ कोटींची लक्झरी कार जमिनीत पुरली; काळजात चर्र करणारा Video

लेकाच्या आठवणीत बापाने ६ कोटींची लक्झरी कार जमिनीत पुरली; काळजात चर्र करणारा Video

मुलाच्या मृत्यूचा धक्का काय असतो हे तोच व्यक्ती समजू शकतो ज्याने आपल्या काळजाचा तुकडा गमावला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कशा प्रकारे एका वडिलांनी आपल्या मुलाच्या निधनानंतर ६ कोटी रुपयांची नवीन BMW कार त्याच्या कबरीजवळ पुरली. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांनी आपल्या मुलाला त्याच्या वाढदिवसानिमित्त 'सरप्राईज गिफ्ट' म्हणून ही BMW कार दिली होती. मुलाने कधीही महागड्या गाडीची इच्छा व्यक्त केली नव्हती, परंतु वडिलांनी प्रेमापोटी ६ कोटींची ही आलिशान कार खरेदी केली होती. 

कार घरी येऊन काहीच दिवस झाले होते, याच दरम्यान मुलाचा मृत्यू झाला. दररोज सकाळी जेव्हा वडील ती कार पाहत, तेव्हा त्यांचं मन दु:खाने भरून येत असे. मुलाच्या आठवणी त्यांना शांत बसू देत नव्हत्या.


शेवटी वडिलांनी निर्णय घेतला की, जर मुलगाच या जगात राहिला नाही, तर या कारचा काय उपयोग? त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदला आणि ती नवीन BMW कार मुलाच्या कबरीजवळ खड्डा करून त्यात पुरली. त्यानंतर कारवर काँक्रीट टाकलं जेणेकरून कोणीही ती बाहेर काढू शकणार नाही. 

वडिलांनी कारची चावी देखील त्याच खड्ड्यात फेकून दिली. हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकजण याला वडिलांच्या अफाट प्रेमाचं प्रतीक मानत आहेत, तर काहीजण याला भावनेच्या भरात उचललेलं मोठं पाऊल म्हणत आहेत.

Web Title : बेटे की याद में पिता ने दफनाई 6 करोड़ की लग्जरी कार

Web Summary : बेटे की मौत से दुखी एक पिता ने उसकी याद में 6 करोड़ रुपये की बीएमडब्ल्यू कार को कब्र के पास दफना दिया। बेटे को उपहार में दी गई कार की याद पिता को सता रही थी, जिसके चलते उन्होंने यह कदम उठाया।

Web Title : Grieving father buries ₹6 crore luxury car in son's memory.

Web Summary : A father, overwhelmed by his son's death, buried a ₹6 crore BMW near his grave. He had gifted the car to his son, who died soon after. Unable to bear the sight of it, the father decided to bury the car, symbolizing his profound loss.