Fact Check Look at this photo & decide whether PM Modi leh hospital visit was just a 'stunt'! | Fact Check: हा फोटो बघा आणि मोदींची 'ती' हॉस्पिटलभेट केवळ 'स्टंट' होता का तुम्हीच ठरवा!

Fact Check: हा फोटो बघा आणि मोदींची 'ती' हॉस्पिटलभेट केवळ 'स्टंट' होता का तुम्हीच ठरवा!

मुंबई – भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लेह दौरा केला होता. या दौऱ्यात गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांची मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. या दौऱ्याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. अनेकांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये घेतलेली भेट आणि काही फोटो व्हायरल केले.

सोशल मीडियावर पंतप्रधानांचे फोटो शेअर करत हे खरचं हॉस्पिटल आहे का? असा सवाल उपस्थित केला. प्रसिद्धीसाठी मोदींकडून सगळं काही ऑर्गनाईज करण्यात आल्याचा आरोप झाला. लोकांनी यावर भाष्य करताना हॉस्पिटलमधील पोडियम, प्रोजक्टर, स्क्रीन, फ्रेम्ड फोटोज यासोबत मेडिकल उपकरण नसल्याचा दावा केला. युवक काँग्रेसचे श्रीवास्तव यांनी ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी कॉन्फरन्स रुमला हॉस्पिटल बनवलं असं सांगत फोटो शेअर केला.

तर अभिषेक दत्त नावाच्या युजर्सने ट्विटवर लिहिलं की, पण हे हॉस्पिटल वाटतं कसं? ना कोणती ड्रीप, डॉक्टरऐवजी फोटोग्राफर, बेडसोबत औषध नाहीत, पाण्याची बॉटल नाही, सुदैव इतकचं की, आपले वीर सैनिक बरे आहेत.

काय आहे सत्य?

याबाबत पडताळणी केली असता भारतीय लष्कराने यावर स्पष्टीकरण दिलं. त्यात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ जुलै २०२० रोजी लेह येथील सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी जखमी सैनिकांची विचारपूस केली. याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सुविधांबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काहींनी लावलेले आरोप दुर्दैवी आणि निराधार आहेत. वीर सैनिकांच्या उपचार व्यवस्थेला घेऊन शंका उपस्थित करणे दुर्दैवी आहे. सशस्त्र दलाकडून सैनिकांच्या उपचारासाठी सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करण्यात येते.

तसेच या सुविधांमध्ये १०० बेड्स आहेत, सामान्य रुग्णालयाचा हा एक भाग आहे. सामान्य रुग्णालयातील काही वार्ड्स आयसोलेशन वार्ड्समध्ये रुपांतरित केले आहेत. कारण याठिकाणी कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार होऊ शकतील. हा हॉल ऑडिओ-व्हिडीओ ट्रेनिंगसाठी वापरण्यात येतो. जखमी जवानांना गलवान खोऱ्यातून येथे आणल्यानंतर या हॉलमध्ये ठेवण्यात आले. कारण कोरोना संक्रमित रुग्णांशी त्यांचा संपर्क टाळता येईल. आर्मी चीफ एमएम नरवणे आणि कमांडर हेदेखील जवानांना भेटले होते.

खाली दिलेल्या अधिकृत ट्विटमध्ये लष्कर प्रमुख एमएम नरवणे यांनी लेह हॉस्पिटलचा दौरा केला होता. त्याचे फोटो पाहता येतील. २३ जून रोजीचे हे फोटो आहेत.  त्यामुळे सोशल मीडियात उपस्थित करण्यात येत असलेले प्रश्न चुकीचे आहेत हे निष्पन्न होतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 चीनविरुद्धच्या संघर्षात रशियाने केली भारताची छुप्या पद्धतीनं मोठी मदत

...अन्यथा होणार कारवाई; लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी सरकारचे '७ कलमी' आदेश

कोरोनापाठोपाठ आणखी एका विषाणूचा मानवाला धोका; चीनने केला अलर्ट जारी

रुग्णालयाची धक्कादायक ऑफर; २५०० रुपयांत कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fact Check Look at this photo & decide whether PM Modi leh hospital visit was just a 'stunt'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.