सलूनमध्ये जाऊन फेस मसाज करणं पडेल महागात, डॉक्टरांनी सांगितलं दृष्टी घालवू शकते मसाज गन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:08 IST2026-03-10T15:07:46+5:302026-03-10T15:08:26+5:30

How Face Massage Gun Damage Eyes : खासकरून जेव्हा मसाज करण्यासाठी हाय-फ्रीक्वेन्सी मसाज गनचा वापर डोळ्यांजवळ केला जातो. डॉक्टर सांगतात की, याने मोतिबिंदूचा देखील धोका असतो.

Eye doctor tells facial massages can cause cataracts vision loss | सलूनमध्ये जाऊन फेस मसाज करणं पडेल महागात, डॉक्टरांनी सांगितलं दृष्टी घालवू शकते मसाज गन

सलूनमध्ये जाऊन फेस मसाज करणं पडेल महागात, डॉक्टरांनी सांगितलं दृष्टी घालवू शकते मसाज गन

How Face Massage Gun Damage Eyes : सलूनमध्ये जाऊन केस कापणे, दाढी करण्यासोबतच बरेच लोक फेस मसाजचा देखील आनंद घेतात. फेस मसाजने त्वचा फ्रेश होते आणि स्नायूंना मोकळे होतात. पण हा थोडावेळ मिळणारा आराम आपल्या डोळ्यांचं मोठं नुकसान करू शकतो. एका डोळ्यांच्या डॉक्टरांनी अलिकडेच इशारा दिला आहे की, काही खासप्रकारची मसाज डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. खासकरून जेव्हा मसाज करण्यासाठी हाय-फ्रीक्वेन्सी मसाज गनचा वापर डोळ्यांजवळ केला जातो. डॉक्टर सांगतात की, याने मोतिबिंदूचा देखील धोका असतो.

डोळ्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या आलेल्या एका केसबाबतची माहिती शेअर केली आहे. डॉक्टरांकडे एक तरूण गेला होता आणि त्याच्या उजव्या डोळ्यात अचानक मोतिबिंदू झाला. जेव्हा डॉक्टरांनी त्याला त्याच्या रोजच्या सवयींबाबत विचारलं तेव्हा समोर आलं की, तो आठवड्यातून दोन ते तीन वेळा फेस मसाज करत होता. ज्या सलूनमध्ये तो जात होता तिथे हाय-फ्रीक्वेंसी मसाज गन आणि इलेक्ट्रिक मसाजचा वापर केला जात होता. सगळ्यात हैराण करणारी बाब ही होती की, मसाजदरम्यान मशीन थेट डोळ्यांवरही फिरवली जात होती.

मसाज गनने डोळ्यांचं नुकसान डॉक्टरांनुसार, मसाज गनमधून होणाऱ्या जास्त कंपनामुळे डोळ्यात शॉकवेव म्हणजे झटक्यासारखे तरंग निर्माण होतात. या तरंगांनी डोळ्यातील नाजूक भागांचं नुकसान होतं. डोळ्याच्या लेन्सवर याचा प्रभाव पडू शकतो आणि अचानक धुसर दिसू शकतं. ज्याला मोतिबिंदू म्हणतात. डॉक्टर म्हणाले की, इंटरनेटवर शोधल्यावर अशा कितीतरी केसेस समोर आल्या, ज्यात डोळ्यांचं मसाज गनने नुकसान झालं.


एक्सपर्टनुसार जेव्हा डोळ्यांजवळ हाय-फ्रीक्वेन्सी व्हायब्रेशन पोहोचतं तेव्हा याने कूप आणि कॉन्ट्रेकूप नावाची इजा होऊ शकते. याचा अर्थ असा की, कंपनाचा दबाव डोळ्यावर पडून डोळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. मोतिबिंदू होण्याचा धोकाही वाढतो. इतकंच नाही तर याने डोळ्याच्या आतील थराचं देखील नुकसान होऊ शकतं. जर रेटिनाचं नुकसान झालं तर नेहमीसाठी दृष्टी जाऊ शकते. त्यामुळे डोळ्यांवर किंवा आजूबाजूला अशा मसाज उपकरणांचा वापर टाळला पाहिजे. 

Web Title : चेहरे की मसाज गन से आँखों को खतरा, डॉक्टर की चेतावनी!

Web Summary : चेहरे की मसाज गन, खासकर हाई-फ्रीक्वेंसी वाली, आँखों को नुकसान पहुंचा सकती है, जिससे मोतियाबिंद और दृष्टि हानि हो सकती है। डॉक्टर आँखों के पास इनके इस्तेमाल के खिलाफ चेतावनी देते हैं।

Web Title : Face massage guns can damage eyes, warns doctor: Be cautious.

Web Summary : Facial massage guns, especially high-frequency ones, can harm eyes, potentially causing cataracts and vision loss. Doctors warn against using them near the eyes due to shockwaves.