शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

Viral Video: तुझा परफॉर्मन्स वीक का? बॉसच्या प्रश्नाला एम्प्लॉयीने दिलं सडेतोड उत्तर, बॉसची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 13:45 IST

व्हिडिओ कंटेंट क्रिएटर (Content Creator) आणि पॉडकास्टर (Podcaster) क्रिस बी (Kris B) यांनं टिकटॉक (TikTok) आणि इन्स्टाग्राम रीलवर (Instagram Reel) हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, क्रिसनं त्याच्या कामाच्या ठिकाणची एक घटना रि-एनअ‍ॅक्ट (Re-enact) केली आहे.

अलीकडेच एका टिकटॉक (TikTok) व्हिडिओनं नेटिझन्समध्ये खासगी कंपन्यांच्या वर्क पॉलिसीबाबत संताप निर्माण केला आहे. अनेक खासगी कंपन्या (Private Companies) त्यांच्या कर्मचार्‍यांना कामाचा योग्य मोबदला न देता अन्यायकारक धोरण अवलंबत असल्याचं, या व्हिडिओतून समोर आलं. व्हिडिओ कंटेंट क्रिएटर (Content Creator) आणि पॉडकास्टर (Podcaster) क्रिस बी (Kris B) यांनं टिकटॉक (TikTok) आणि इन्स्टाग्राम रीलवर (Instagram Reel) हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, क्रिसनं त्याच्या कामाच्या ठिकाणची एक घटना रि-एनअ‍ॅक्ट (Re-enact) केली आहे.

या क्लिपमध्ये क्रिस त्याच्या बॉससोबत व्हर्च्युअल कॉलवर (Virtual Call) मीटिंग करत आहे. त्याचा बॉस क्रिसच्या २०२१ आणि २०२० मधील कामगिरीतील फरकाबाबत चर्चा करत आहे. २०२०मध्ये क्रिस टॉप-रेटेड कर्मचारी (Top-rated Employee) होता. पण, यावर्षी (२०२१) क्रिसचा परफॉर्मन्स खूपच कमी आहे. यामागे काय कारण आहे? असा प्रश्न बॉस विचारतो.

बॉसच्या प्रश्नाला उत्तर देताना, क्रिसनं काही हार्ड हिटिंग फॅक्ट्स (Hard-hitting Fact) मांडल्या आहेत. त्याच्या या कृतीचा असंख्य व्ह्युअर्सवर (Viewers) प्रभाव पडला आहे. २०२० मधील आपली कामगिरी स्पष्ट करताना क्रिसनं अतिशय शांत आणि प्रामाणिकपणे बॉससोबत संवाद साधला. 'टॉप रेटेड कर्मचारी झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं अ‍ॅप्रिसिएशन मिळालं नाही. म्हणून पुढील वर्षीसुद्धा तेवढ्याच प्रमाणात कष्ट करण्याची आपली इच्छा झाली नाही,' असं क्रिस बॉसला सांगतो.क्रिस पुढे म्हणतो की, '२०२०मध्ये तो सलग दुसऱ्या वर्षी टॉप रेटेड एम्प्लॉई होता. तरीदेखील त्याला पगारवाढ (Raise) मिळाली नाही. जेव्हा त्यानं याबाबत विचारणा केली तेव्हा ऑफिसमधील पोझिशनमुळे (Office Position) पगारवाढ मिळाली नसल्याचं सांगण्यात आलं. शिवाय, माझा पगार माझ्या पोझिशनसाठी योग्यच आहे असंही सांगण्यात आलं होतं आणि आता पुन्हा तुम्हीच म्हणत आहात की माझा पगार पे स्केलवर (Pay Scale) 'बिलो द मीडियन' (Below the Median) आहे. या सर्व कारणांमुळेच मी माझी कामगिरीसुद्धा 'बिलो द अ‍ॅव्हरेज' ठेवली आहे.'

'माझा परफॉर्मन्स चांगला असूनही मला प्रोत्साहन मिळालं नाही. कंपनीनंच अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, मला माझा परफॉर्मन्स सुधारण्याची इच्छा झाली नाही. त्यामुळे जितका पगार मिळतो आहे तितकंच काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे,' असंदेखील क्रिस म्हणाला आहे.

क्रिसच्या या रिस्पॉन्सनंतर बॉसची बोलती बंद झाली आणि व्हिडिओ कॉलवर लाँग ऑकवर्ड सायलेन्स (Awkward Silence) निर्माण झाला. या व्हिडिओला नेटिझन्सकडून (Netizens) सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. इन्स्टाग्राम युजर्सपैकी एकानं रीलवर 'ब्लडी एपीक! नो युवर वर्थ', अशी कमेंट केली आहे.

नेटिझन्समध्ये बॉसच्या प्रतिसादाबद्दलही उत्सुकता होती. त्याबाबत क्रिसनं नवीन इन्स्टाग्राम रील शेअर केलं आहे. 'झाल्या प्रकाराबाबत बॉसनं दिलगिरी व्यक्त करत क्रिसला व्यवस्थित काम करण्याची विनंती केली आहे, असं क्रिसनं नवीन रीलमध्ये सांगितलं आहे. क्रिसनं कॅप्शममध्ये लिहिलंय, 'लेऑफच्या दिवशीच माझा बॉस रिटायर होतोय. आता मी ही नोकरी सोडेपर्यंत माझ्या मर्जीचा मालक असेन म्हणजेच मीच माझा बॉस असेन.' क्रिस आणि त्याच्या बॉसचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामEmployeeकर्मचारी