VIDEO: व्वा भावा... जिंकलंस! केळी विकणाऱ्या महिलेला मदतीचा हात; तरुणाच्या कृतीने जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 12:44 IST2026-02-08T12:42:51+5:302026-02-08T12:44:44+5:30

Emotional Viral Video: ती महिला अडचणीत असल्याचे स्पष्ट दिसत होते

emotional video goes viral lady selling banana on streets crying man helped her heart touching gesture social media | VIDEO: व्वा भावा... जिंकलंस! केळी विकणाऱ्या महिलेला मदतीचा हात; तरुणाच्या कृतीने जिंकली मनं

VIDEO: व्वा भावा... जिंकलंस! केळी विकणाऱ्या महिलेला मदतीचा हात; तरुणाच्या कृतीने जिंकली मनं

Emotional Viral Video: असे अनेक लोक असतात ज्यांना इतरांचे दुःख पाहावत नाही. ते कायम अशा मंडळींना मदत करण्यास इच्छुक असतात. अशा व्यक्तींचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे अतिशय संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण रस्त्याच्या कडेला केळी विकणाऱ्या महिलेला मदत करताना दिसतो. त्याच्या छोट्याशा कृतीने जगात अजूनही माणुसकी आहे, असे पुन्हा एकदा सारे अभिमानाने म्हणू शकतात. व्हिडीओतील त्याच्या कृतीने नेटकऱ्यांचीही मने जिंकली आहेत.

व्हिडिओच्या सुरुवातीला एक महिला रस्त्याच्या कडेला केळी विकत बसलेली असते आणि रडत असते. ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याचे दिसते. त्यानंतर एक तरुण येतो आणि तिच्याशी गप्पा मारत बसतो. तिच्याशी बोलता बोलता तो तिचे दु:ख समजून घेतो. त्यानंतर तो तरुण महिलेच्या ठेल्यावरची केळी खरेदी करतो आणि तिला त्याचे पैसे देतो. केळी विकली जातात आणि पैसे मिळतात त्यानंतर त्या महिलेच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. तो तरुण नंतर तिच्याकडून विकत घेतलेली केळी रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या गरीबांना देतो.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Vini____007 या युजरने शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "तुम्ही चांगले कर्म करत राहा. मग तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणीही नसेल." या दीड मिनिटांच्या व्हिडीओची सध्या खूप चर्चा आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर कमेंट करताना, माणूसकी अजूनही जिवंत आहे, असे लिहिले आहे.

Web Title : दयालु व्यक्ति ने फल विक्रेता की मदद की, जीता दिल।

Web Summary : एक वीडियो में एक युवक आर्थिक रूप से परेशान केला बेचने वाली महिला की मदद कर रहा है। वह उसके सारे फल खरीदकर गरीबों में बांट देता है, जिससे उसकी मुस्कान लौट आती है और दर्शकों को प्रेरणा मिलती है।

Web Title : Kind man helps struggling fruit vendor, wins hearts online.

Web Summary : A video shows a young man assisting a financially distressed woman selling bananas. He buys all her fruit and then distributes it to the poor, restoring her smile and inspiring viewers with his act of kindness.