Video : विमानाची एअरपोर्टवर दमदार एन्ट्री, एकदा बघाल बघतच रहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 13:40 IST2019-08-07T13:39:49+5:302019-08-07T13:40:14+5:30
सोशल मीडियात सध्या एका विमानाच्या दमदार एन्ट्रीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला असेल ते बघतच राहिले असतील यात शंका नाही.

Video : विमानाची एअरपोर्टवर दमदार एन्ट्री, एकदा बघाल बघतच रहाल!
सोशल मीडियात सध्या एका विमानाच्या दमदार एन्ट्रीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला असेल ते बघतच राहिले असतील यात शंका नाही. हा व्हिडीओ अमीरात एअरलाइन्सने ट्विटरवर शेअर केला. केवळ १० सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत ७९ हजार लोकांनी पाहिला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ लंडनच्या गॅटविक एअरपोर्टचा आहे. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, अमीरात एअरलाइन्सचं एक विमान ढगांना कापत एअरपोर्टवर दमदार एन्ट्री घेत आहे. ट्विटरवर अनेकांना हा व्हिडीओ रिट्विट केला आणि वेगवेगळ्या कमेंटही केल्या जात आहे.
Beautiful shot, great entrance indeed.
— Clive Hallam (@challam19) August 1, 2019
Mind blowing. Awesome video shooting. It's looking like, King coming down on the runway. 👍👌
— Soumya Chakraborty ~ সৌম্য চক্রবর্তী (@Soumya1408) August 1, 2019