गावात घुसलेल्या 14 हत्तींनी 30 लिटर वाईन संपवली अन् पुढे काय झालं ते बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 15:44 IST2020-03-20T15:37:37+5:302020-03-20T15:44:02+5:30

आजपर्यंत तुम्ही दारू ढोसून रस्त्यावर किंवा इकडे तिकडे पडलेली माणसे अनेकदा पाहिली असतील. मात्र, या दोन हत्तींनी माणसांना याबाबत मागे सोडलं आहे.

Elephants possibly drunk from wine and sleep in fields pics goes viral api | गावात घुसलेल्या 14 हत्तींनी 30 लिटर वाईन संपवली अन् पुढे काय झालं ते बघा...

गावात घुसलेल्या 14 हत्तींनी 30 लिटर वाईन संपवली अन् पुढे काय झालं ते बघा...

सोशल मीडियात हत्तींचे दोन फोटो व्हायरल झाले असून या फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे. इतकी चर्चा व्हायला कारणही तसंच आहे. आजपर्यंत तुम्ही दारू ढोसून रस्त्यावर किंवा इकडे तिकडे पडलेली माणसे अनेकदा पाहिली असतील. मात्र, या दोन हत्तींनी माणसांना याबाबत मागे सोडलं आहे. एका गावात 14 हत्ती शिरले आणि त्यांनी 30 लिटर वाइन सेवन केली. पुढे जे झाले ते या फोटोत आहे.

चीनच्या Yunnan मधील एका गावातील ही घटना आहे. 14 हत्तींचा एक कळप गावात शिरला आणि त्यांनी तिथे ढिंगाणा घातला. एका ट्विटनुसार, आधी हत्तींनी कॉर्न आणि खाण्यासाठी शोध घेतला. नंतर त्यांनी वाइनचं संपवली.

मिळालेल्या माहितीनुसार, या हत्तींनी 30 लिटर कॉर्न वाइन फस्त केली. त्यानंतर दोन हत्ती गाढ झोपी गेले. आरामात ते झोपलेले दिसत आहे. आयएफएस प्रविण कासवान यांनीही हा फोटो शेअर केला आहे. 

हत्तींच्या या फोटोंवर लोक मजेदार कमेंटही करत आहेत. काही लोक म्हणाले की, हत्तींना हॅंगओव्हर झाला आहे. 


Web Title: Elephants possibly drunk from wine and sleep in fields pics goes viral api