मृत पिल्लाला सोंडेत घेऊन बराच वेळ तशीच फिरत राहिली हत्तीण, घटनेचा व्हिडिओ पाहुन अश्रु होतील अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:22 PM2021-09-15T17:22:04+5:302021-09-15T17:22:14+5:30

मनुष्य भावना व्यक्त करु शकतो पण प्राण्यांच काय? तेही खरंतर आपल्या भावना व्यक्त करतात पण शब्दातुन नाही तर कृतीतून. एका हत्तीणीचं पिल्लु मृत पावलं. त्यानंतर तिनं जे केलं ते पाहुन तुम्हाला अश्रु अनावर होतील.

elephant carrying her dead calf in trunk video goes viral on social media | मृत पिल्लाला सोंडेत घेऊन बराच वेळ तशीच फिरत राहिली हत्तीण, घटनेचा व्हिडिओ पाहुन अश्रु होतील अनावर

मृत पिल्लाला सोंडेत घेऊन बराच वेळ तशीच फिरत राहिली हत्तीण, घटनेचा व्हिडिओ पाहुन अश्रु होतील अनावर

Next

मनुष्य असो अथवा प्राणी दोघांनाही भावना असतात. मनुष्य भावना व्यक्त करु शकतो पण प्राण्यांच काय? तेही खरंतर आपल्या भावना व्यक्त करतात पण शब्दातुन नाही तर कृतीतून. एका हत्तीणीचं पिल्लु मृत पावलं. त्यानंतर तिनं जे केलं ते पाहुन तुम्हाला अश्रु अनावर होतील.

सोशल मीडियावर पोस्ट केला गेलेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक हत्ती आपल्या लहान बाळाला सोंडेत घेऊन फिरत आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की एक हत्तीण आपल्या मृत पिल्लाला घेऊन जाताना. हत्ती जेव्हा आपल्या पिल्लाचा मृतदेह सोंडेत अशा पद्धतीनं घेऊन जातात तेव्हा ते शोक व्यक्त करत असतात. 

सोशल मीडियावरील हा फोटो पाहून लोकही भावुक झाले. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूजरनं म्हटलं, की माणूस असू किंवा प्राणी सर्वांची आपल्या बाळांसाठी समान भावना असते. आणखी एका यूजरनं म्हटलं, की माणूस अनेकदा प्राण्यांना चुकीचं समजतो मात्र यामागे त्यांचं दुःख आणि वेदना असतात. ट्वीटरवर हा व्हिडिओ @ScienceIsNew नं शेअर केला आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून हत्तीणीचं दुःख पाहावलं गेलं नाही.

Web Title: elephant carrying her dead calf in trunk video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.